श्री.विक्रमसिंह शिंदे बहुउद्देशीय संस्थेचकडून गुणवंताचा सन्मान

38

✒️नागेश खूपसे(सोलापूर प्रतिनिधी)मो:-7775096293

सोलापूर(दि.11डिसेंबर):-मा.श्री.विक्रमसिंह शिंदे बहुउद्देशीय संस्था सोलंकरवाडी व ग्रामीण विकास संस्था माढा यांचे वतीने लॉकडाऊन काळात ऑनलाईन आयोजित करण्यात आलेल्या चित्रकला व निबंध स्पर्धेतील गुणवंत विद्यार्थ्यांना माढा तालुका पंचायत समितीचे सभापती श्री.विक्रमसिंह दादा शिंदे यांचे हस्ते विठ्ठलराव शिंदे सभागृह पंचायत समिती कुर्डुवाडी येथे सन्मानित करण्यात आले.

या वेळी जि.प सदस्य आप्पासाहेब उबाळे, उपसभापती धनाजी जवळगे, प.स सदस्य डॉ. प्रदीप पाटील,अनिल मोरे,संस्थापक विक्रम भांगिरे,स्पर्धा प्रमुख विलास काळे सर यांच्यासह संस्थेचे पदाधिकारी,विध्यार्थी व पालक मोठया संख्येने उपस्थित होते.