बहुजन एम्प्लॉइज फेडरेशन तर्फे शेतकरी विरोधी धोरनाचा निषेध

    41

    ✒️रोशन मदनकर(उप संपादक)मो:-8888628986

    चंद्रपूर(दि.11डिसेंबर):-दिल्लीत होत असलेल्या शेतकरी आंदोलनाला जाहीर पाठिंबा म्हणून बहुजन एम्प्लॉइज फेडरेशन, महाराष्ट्र राज्याच्या वतीने जाहीर निषेध नोंदविला असून केंद्र शासनाने शेतकरी विरोधी जे कायदे केलेले आहेत ते कायदे अन्यायकारक असल्याच्या भावनेतून शेतकऱ्यांनी दिल्लीत आंदोलन पुकारले आहे शेतकऱ्यांचा माल कवडीमोल भावाने विकण्याचे कटकारस्थान या शेतकरी विरोधी कायद्यात आहे.तसेच शेतकऱ्यांच्या जमीनी काही मोजक्या उद्योगपतींना व कार्पोरेट कम्पण्यांना या नवीन कायद्याच्या माध्यमातून बळीराजाला नागवून उद्योगपतींच्या घशात घालण्याचे कटकारस्थान रचल्या जात आहे.

    म्हणून शेतकऱ्यांनी पुकारलेल्या 8 डिसेंबरच्या भारत बंदला बहुजन एम्प्लॉइज फेडरेशनने जाहीर पाठिंबा देऊन चंद्रपूर येथिल डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या पूर्णाकृती पुतळ्यापासून काढण्यात आलेल्या दुचाकी रॅलीत व पदयात्रेत सक्रिय सहभाग नोंदवला सदर रॅली महात्मा गांधी मार्ग,जटपुरा गेट, प्रियदर्शनी चौक, कस्तुरबा मार्ग, गिरनार चौक, गांधी चौक व परत डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याजवळ येऊन विसर्जन करण्यात आले बहुजन एम्प्लॉइज फेडरेशन तर्फे महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष राजकुमार जवादे,राज्याचे सह सचिव मुन्ना आवळे, चंद्रपूर जिल्हाध्यक्ष रवींद्र येसांबरे, जिल्हा सल्लागार नवनाथ देरकर इत्यादी पदाधिकारी रॅलीत सहभागी झाले होते.