शाळेचा पहिला दिवस

30

शाळेचा पहिला दिवस
देतो मनाला आनंद
कधी सांगेन मित्रांना
सुट्टीतील नवे छंद

खरोखर शाळेचा पहिला दिवस एक सुख कारक अनुभव आहे. परीक्षा संपली की कधी एकदा सुट्टी लागते आस वाटत पण सुट्टी थोड्या काळा पुरती बरी वाटते.थोडया दिवसात च शाळेची ओढ लागते शाळा कधी सुरू होते असच वाटत.सुट्टीतील गमती , सुट्टीत केलेली मजा कधी एकदा मित्र, मैत्रिणींना सांगू अस होत हो कि नई ,लहान मुलेच काय प्रत्येक जण शाळा सूरू व्हायची वाट पहात असतो.

शाळेचा पहिला दिवस म्हणजे खुप आनंदी आणि उत्साही असतो. नविन कपडे,नवी पुस्तके, नविन वर्ग, नवे मित्र, नविन शिक्षक सगळ कस नव नव असत. आणि सृष्टी ही नवा साज लेवून सजलेलीआसते.रिमझिम पाऊस, थंडगार वारा, सगळी कडे हिरवळ मन मोहून जात अस वातावरण आणखी उत्साह वाढवत.रिमझिम पावसात छत्री घेउन शाळेत जायला खुप खुप मजा येते. असा हा शाळेचा पहिला दिवसपुन्हा नव्याने अनुभवावा वाटतो.

खुप दिवसांनी भेटतात
मित्र मैत्रिणी जोमान
पुन्हा नव्याने अनुभवावे
शाळेतील पहिल्या दिवशीचे क्षण

शाळेतील घंटेचा तो आवाज, रांगेत उभे राहून म्हणले ली प्रार्थना, सारं सारं कस आनंद देणार आसत. म्हणुनच शाळेचे वेध सर्वांना लागतात.पण या वर्षी पहिल्यांदाच अस झालय की १५जुनला शाळा सुरू झाली नाही.घंटेचा आवाज ऐकायला आला नाही.मुलांची रस्त्यावर गडबड,पळापळ नाही,दुकाने उघडली नाहीत,वहयापुस्तकाच्या खरेदीसाठी पालकांची ,मुलांची
धांदल नाही. मुलांना शाळेची ओढ सतावतेय , मित्र,मैत्रिणी भेटीसाठी अतुर झाल्या आहेत.शिक्षकांचे शब्दकानावर कधी पडतात त्या साठी मन उतावीळ झालय.देवा आतातरी संपव बाबा हि कोरोना ची भिती जगू दे आनंदाने बागडूदे स्वच्छंदी मुलांना हिच मनापासून प्रार्थना.

✒️लेखिका:-सौ अनुराधा रत्नाकर उपासे
मंगरूळ ता तुळजापूर
जि उस्मानाबाद

▪️अंगद दराडे(बीड,जिल्हा प्रतिनिधी)मो:-8668682620