वा.. वा .. आत्ता, सरपंच निवडणूक झाल्यावर आरक्षण सोडत

    41

    ✒️नागेश खुपसे(सोलापूर प्रतिनिधी)मो:-7775096293

    सोलापूर(दि.11डिसेंबर):-महाराष्ट्रातील १४२३४ ग्रामपंचीच्या निवडणूक जाहीर झाल्या आहेत. निवडणूका जाहीर होताच गाव पुढाऱ्यांनी देव पाण्यात ठेवले आहेत. सरपंच पदाचे आरक्षण कोणत्या जात प्रवर्गातील असेल यासंदर्भात उलटसुलट चर्चा चालू असतानाच याबाबतीत एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे.

    की एप्रिल २०२० नंतर नव्याने येणाऱ्या सर्व ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाचे आरक्षण सोडत दि. १५ जानेवारी २०२१ रोजी अशी विनंती महाराष्ट्र शासनाचे उप सचिव ल. स. माळी यांनी महाराष्ट्रातील सर्व जिल्हाधिकारी यांना केली आहे. त्यामुळे सरपंच पदाची माळ नेमकी कोणाच्या गळ्यात पडणार? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

    यापूर्वी सरपंच पदाचे आरक्षण निवडणुकी पूर्वी असायचे ,तेव्हा विशिष्ट व्यक्ती उमेदवार असतानाच सरपंच असल्याचे आविर्भावात वागायचे, सरपंच पद मिळविण्यासाठी अन्य उमेदवार निवडून आणण्याकरीता वाटेल तेवढी आर्थिक उलाढाल करीत होते. आता या नवीन परिपत्रकाने गाव पुढाऱ्यांचे नियोजन विस्कळीत झाल्याचे चित्र दिसत आहे.

    बघू या पुढे काय होते ? ..सध्यातरी पुढारपण कोणी करायचे यांचेच नियोजन ग्रामीण राजकीय नेते करीत आहेत.