उपजिल्हाधिकारी अजित थोरबोले यांचे तर्फे अभ्यासिकेला पुस्तकांची भेट

50

✒️नागेश खूपसे(सोलापूर प्रतिनिधी)मो:-7775096293

सोलापूर(दि.12डिसेंबर):-उपळवटे येथे नव्याने सुरू झालेल्या अभ्यासिकेला पुस्तक भेटीचा ओघ दिवसेंदिवस वाढतच जात आहे. आपल्या गावातील नूतन अभ्यासिकेची बातमी उपजिल्हाधिकारी म्हणून कार्यरत असणारे तसेच जिल्हा परिषद प्राथमिक शाळा उपळवटे चे माजी विद्यार्थी श्री अजित थोरबोले यांच्या कानावर गेली असता त्यांनी सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक केले.

तसेच लागलीच त्यांनी स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त असणारी स्वतःची नवीन पुस्तके भेट म्हणून दिली. तसेच विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी शुभेच्या देखील पाठवल्या. आपल्या गावच्या शाळेत जरी ते सध्या नसले तरी त्यांच्या मनातील शाळेविषयी व उपळवटे गावाविषयी असणारा आपुलकीचा भाव व अभिमान यातून पुन्हा एकदा अधोरेखित होतो.यातून उपळवटे गावात नवीन अधिकारी वर्ग तयार होवो ही अपेक्षा श्री थोरबोले यांनी व्यक्त केली.