मरखेल ग्रामपंचायतीचा ढिसाळ कारभार

    35

    ✒️महादेव उप्पे(देलगुर प्रतिनिधी)मो:-९४०४६४२४१७

    देगलूर(दि.12डिसेंबर);- तालुक्यातील मरखेल जिल्हा परिषद हायस्कुल येथे डिसेंबर २०१९ मध्ये मुलींसाठी शौच्छालय तयार करण्याचे काम चालू करण्यात आले होते,तरी एक वर्षे संपत आला असून त्या शौच्छालयाचे काम पूर्ण झालेले नाही.अनेक वेळा ग्रामपंचायत प्रशासनाकडे या कामाची दखल पण घेण्यात आली असता,ग्रामपंचायतीकडून उडवाउडवीचे उत्तर मिळाले आहे.

    म्हणून दि.०२/१२/२०२० रोजी जिल्हा ,तालुका व ग्रामपंचाय कार्यालयाला लेखी तक्रार दिली.जे काम करण्यात आले होते ते बांधकाम अपूर्ण व निक्रष्ट दर्जाचे आहे.या कामासाठी १० डिसेंबर मानवी हक्क दिनापर्यंतची देण्यात आली होती,ते काम नाही झाल्यास अमरण उपोषणाचा इशारा देण्यात आला होता.

    मरखेल ग्रामपंचायत कार्यालयाकडून या निवेदनाची कोणतीच दखल घेतली नसल्यामुळे मो.अलीसाब निजामोदिन माळेगावकर, श्रीकांत किशनराव मोखेडे पत्रकार[ सामाजीक कार्यकर्ता ]यांनी दि.११/१२/२०२०रोज शुक्रवारी सकाळी ११ः०० वाजल्यापासून अमरण उपोषणाला सुरुवात केली.या मागण्या पूर्ण होईपर्यंत आमचा उपोषण असाच चालू राहिल असा इशारा देण्यात आला आहे.