पेट्रोल डिझेल दरवाढीविरोधात चिमुर शिवसेनेचे आंदोलन

33

✒️चिमुर(पुरोगामी संदेश नेटवर्क)

चिमुर(दि.12डिसेंबर):-केंद्र सरकार विरोधात जिल्हाप्रमुख नितिन मत्ते यांच्या आदेशाने चिमुर तालुका शिबसेना च्या वतीने माजी तालुका प्रमुख भाऊराव ठोम्बरे यांचे नेतृत्वात पेट्रोल डिझेल दरवाढी विरोधात व भाजपाचे नेते रावसाहेब दानवे हे शेतकऱ्यांबद्दल करत असलेल्या अवमानकारक वक्तव्याबद्दल निषेद आंदोलन तहसील कार्यालयासमोर करण्यात आले.

यावेळी माजी तालुका प्रमुख भाऊराव ठोम्बरे, उपतालुक प्रमुख रमेश भिलकर, श्रीहरी सातपुते, संतोष जुमड़े, अन्ना गिरी, सुधाकर निवटे, रोशन जुमड़े, मुकुंद खेड़कर, सारंग भट उपस्तित होते.