मराठी साहित्य मंच आयोजीत काव्यलेखन स्पर्धेचा निकाल जाहीर

    40

    ✒️अंगद दराडे(बीड,जिल्हा प्रतिनिधी)मो:-8668682620

    बीड(दि.12डिसेंबर):-मराठी साहित्य मंचच्या समूह प्रमुख सौ शालू विनोद कृपाले यांच्या कन्या तेजस्विनी (स्वीटी ) यांच्या वाढदिवसा निमित्त काव्य लेखन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते .या स्पर्धेत महाराष्ट्रातील अनेक साहित्यिकांनी सहभाग नोंदवला होता .या स्पर्धेसाठी परिक्षक म्हणुन , डॉ लक्ष्मण नाईक पाथरीकर , जी .परभणी यांचे विशेष सहकार्य लाभले.
    काव्य लेखन स्पर्धेचा निकाल पुढील प्रमाने

    सर्वोत्कृष्ट
    कवयित्री सौ . वीणा विकास बाविस्कर
    जि . जळगांव
    उत्कृष्ट
    1) कवयित्री सौ . माधुरी विजय देवरे नाशिक रोड , नाशिक
    2 ) कवयित्री सौ . अनिता कैलास मुंगसे आळंदी देवाची पुणे
    प्रथम
    1) कवयित्री सौ . योगिता भगवंत शिरोरे विठेवाडी.
    2 ) कवी परमानंद ए . जेंगठेमूल , जि . चंद्रपूर)
    द्वितीय
    1 ) कवयित्री श्रीमती शांता मरकम मॅडम (दहातोंडे)
    चांदा , अहमदनगर
    2 ) कवयित्री रत्नाताई भोरे

    तृतिय
    1 ) कवयित्री सौ . स्वाती सुनिल लकारे
    अहमदनगर
    2 ) कवयित्री सरोजनी करजगीकर
    परभणी

    लक्षवेधी
    1 ) कवी अविनाश ठाकूर
    डोंबिवली , जि . ठाणे
    2 ) कवयित्री सौ . विद्या मलवडकर तारगांव , सातारा
    3 ) कवयित्री सौ . भारती रविंद्र कापरे
    अहमदनगर
    4 ) कवयित्री कु . रुपाली चौधरी पिंपळनेर , धुळे*ल
    5 ) कवी जगदिश्वर मारोती मुनघाटे ब्रम्हपुरी जि . चंद्रपूर

    उत्तेजनार्थ
    1 ) कवयित्री सौ . चंदन
    सुशिल तरवडे
    कोपरगांव
    2 ) कवयित्री क्रांती
    पंडितराव करजगीकर
    अहमदनगर
    3 ) कवयित्री सौ . शामल
    अविनाश कामत
    वाशी , नवी मुंबई
    4 ) कवी देवानंद चांगदेव
    यादव आंबवलीकर
    ता . खेड , जि . रत्नागिरी
    5 ) कवयित्री संगीता बोरसे
    चोपडा

    परिक्षकांचे मनोगत

    *******************************

    आपल्या लाडक्या तेजस्विनी / स्विटी या कन्येच्या वाढ दिवसा निमीत्त दि . 4 डिसेंबर 2020 रोजी घेण्यात आलेल्या ..,!

    विषय : अंगणाची शान लेक माझी

    या विषयावरील राज्यस्तरीय काव्य लेखन स्पर्धेच्या परिक्षकपदी माझ्या सारख्या ग्रामिण भागातील सर्व सामान्य , तसेच तुमच्यातीलच एक छोट्याशा कविची आपण निवड केली , त्याबद्दल मी आपला शतश: आभारी आहे.
    सर्वप्रथभ आपली लाडकी कन्या तेजस्विनी / स्विटीस 12 व्या वाढ दिवसा निमीत्त मन:पुर्वक हार्दिक हार्दिक शुभेच्छा . तसेच भावी जीवनासही हार्दिक हार्दिक शुभेच्छा.
    तसेच राज्यस्तरीय काव्य लेखन स्पर्धेतील सर्व सहभागी सदस्यांचे तसेच विजेत्यांचे मन:पुर्वक हार्दिक हार्दिक अभिनंदन.
    या काव्यलेखन स्पर्धेत महाराष्ट्रातुन अनेक नामांकित कवी कवयित्री बंधू भगिनींनी सहभाग घेतला तसेच एकाहुन एक सरस अशा कविता लिहुन पाठवल्या . तसेच या काव्य स्पर्धेची शोभा वाढवली . त्याबद्दल सर्वांचे आभार व्यक्त करतो.
    काव्यलेखन स्पर्धेचे परिक्षक म्हणुन कार्य करणे फारच अवघड तसेच जबाबदारीचे काम आहे . असे हे अवघड काम आपण विश्वास दाखवुन माझ्यावर सोपवले . आपल्या विश्वासास पात्र राहुन , मी आपले हे कार्य निस्वार्थपणे , प्रामाणिकपणे पार पाडले यात तिळमात्र शंका नाही.
    तसेच स्पर्धा म्हटली की हार जीत आलीच . तरी स्पर्धेत ज्यांची निवड झाली नाही त्यांनी खचुन नं जाता कृपया पुन्हा नव्या जोमाने स्पर्धेत सहभागी होऊन स्पर्धा यशस्वी करून , विजेतेपद मिळवुन ध्येय गाठावे.
    तसेच माझ्याकडुन नं कळत कांही चुकले असल्यास मला क्षमा करावी ही नम्र विनंती.
    तसेच भविष्यातही परिक्षक म्हणुन आपली तसेच समुहाची सेवा करण्याची संधी द्यावी ही विनंती . मी सदैव तत्पर आहे.
    तसेच माझे मनोगत जास्त नं लांबवता येथेच थांबतो.

    ********************************

    परिक्षकांचा
    थोडक्यात परिचय .

    डॉ. लक्ष्मण नाईक पाथरीकर
    जि . परभणी
    शिक्षण . विद्युत पर्यवेक्षक
    हिंदी साहित्यात विद्या वाचस्पती , पी . एच . डी .पदवी प्रदान

    अंतर राष्ट्रिय स्तरावर बिहार राज्यातील विद्यापिठाकडुन महाकवी पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले.तसेच राष्ट्रिय , राज्यस्तरीय , विभागीय , जिल्हास्तरीय , काव्यस्पर्धेत अनेक पुरस्कार तसेच सन्मानपत्र प्राप्त.राज्यात तसेच परराज्यात साहित्य तसेच कवी संमेलनात निमंत्रीत कवी म्हणुन निवड तसेच सहभाग.आकाशवाणीवर काव्यवाचन.लेक / कन्या या विषयावर माझा दररोज चारोळी उपक्रम चालू असुन आता पर्यंत 307 चारोळ्या पुर्ण झाल्या आहेत.हिंदी तसेच मराठी दोन्ही भाषेत मिळुन माझ्या 1500 कविता आणि गीत लिहुन पुर्ण झाले आहेत.