बहुजन एम्प्लॉइज फेडरेशन तर्फे पंचायत राज समितीवर निवड झाल्याबद्दल आमदार किशोर जोरगेवार यांचे अभिनंदन

34

✒️रोशन मदनकर(उप संपादक)मो:-8888628986

चंद्रपूर(दि.12डिसेंबर):-विधानसभा क्षेत्राचे आमदार किशोर जोरगेवार यांची महाराष्ट्र विधान मंडळाच्या पंचायत राज समितीवर नियुक्ती झाल्याबद्दल बहुजन एम्प्लॉइज फेडरेशन आफ इंडिया तर्फे आमदार किशोर जोरगेवार यांचे महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष राजकुमार जवादे यांच्या हस्ते अभिनंदन पर पत्र देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.

याप्रसंगी बहुजन एम्प्लॉइज फेडरेशनचे सल्लागार सुभाष मेश्राम, जिल्हा सल्लागार नवनाथ देरकर, रिपब्लिकन मजूर संघटनेचे सचिव राकेश कालेशवारइत्यादि पदाधिकारी उपस्थित होते.