गाव तिथे शाखा” ही संकल्पना घेऊन ठिक ठिकाणी दलित पँथरच्या शाखांचे उदघाटन – महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष डाॅ घनःशाम भोसले

35

✒️कोरेगाव(पुरोगामी संदेश नेटवर्क)

कोरेगाव(दि.12डिसेंबर):- दलित पँथर संघटनेच्या शाखेचे उदघाटन कोरेगाव येथे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष डॉ. घनःशाम भोसले यांच्या हस्ते व पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष विश्वास मोरे आणि सातारा जिल्हाध्यक्ष रोहित अहिवळे यांच्या उपस्थितीत महिला आघाडीच्या कोरेगाव तालुका अध्यक्ष पदी माया कनवाळू यांची तसेच महिला आघाडीच्या कोरेगाव तालुका उपाध्यक्ष पदी शकुंतला ससाने यांची निवड करण्यात आली तर ज्योती पोकळे यांची कोरेगाव शहर महिला आघाडी पदी, मिनाक्षी तळभंडारे यांची कोरेगाव शहराच्या महिला आघाडीच्या कोरेगाव शहराच्या उपाध्यक्ष पदी, तसेच सुलाबाई जाधव यांची सचिव कोरेगाव शहर महिला आघाडी तर नियुक्ती कावेय्या कोरेगाव शहर महिला आघाडीच्या खजिनदार पदी निवड करण्यात आली.

सातारा जिल्ह्यामध्ये मागील अनेक वर्षांपासून दलितावरील अन्याय अत्याचार विरोधात तसेच शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात मोठी कामगिरी दलित पँथर ही संघटना बजावण्यात येत आहे तसेच “गाव तिथे शाखा” ही संकल्पना घेऊन ठीक ठिकाणी शाखांचे उदघाटन ही करण्यात येत आहे.

दलित पँथरचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष डाॅ.घनःशाम भोसले यांनी आपले मनोगत व्यक्त करतांना म्हटले की संगटनेचे काम, समाजकार्य जास्तीत जास्त तळागाळातील लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी तसेच शिक्षण,आरोग्य ह्या पायाभूत सोईसुविधा पासून कोणी गरीब-गरजू वंचित राहू नये व त्यांना जास्तीत जास्त संघटनेतर्फे कशी मदत पोहचली जाईल अश्या निस्वार्थी हेतूने शाखा खोलण्यात येत आहेत. संघटनेची ध्येर्य धोरणे व कार्य विस्तृतपणे मांडतानाच दलित बांधवांनी स्वतःचे प्रश्न सोडविण्यासाठी व हक्क मिळवण्याचा संघर्ष करण्यासाठी संघटनेत सहभागी झालेल्या सर्व पदाधिकारी सदस्यांचे स्वागत आणि अभिनंदन केले.

सातारा जिल्हाध्यक्ष यांनी संघटनेच्या वतीने वेळोवेळी होणार्या आंदोलनात मोठ्या संख्येने सामील होण्याचे आवाहन केले आहे. तसेच दलित पँथर च्या माध्यमातून सातारा जिल्हातील बांधवांना एक हक्काची संघटना उपलब्ध करून दिली आहे.

यावेळी दलित पँथरचे सातारा जिल्हा उपाध्यक्ष लक्ष्मण काकडे, सातारा जिल्हा कार्याध्यक्ष किरण बनसोडे, जिल्हा संघटक अनिरुद्ध खरात,फलटण तालुका अध्यक्ष मंगेश आवळे, फलटण शहर अध्यक्ष आकाश काकडे, फलटण तालुका कार्याध्यक्ष रोहित यशवंत अहिवळे, फलटणचे धडाडीचे कार्यकर्ते पँथर किरण अहिवळे तसेच दलित पँथर चे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.