कोरोना काळात सोशल डिस्टन्सीगचे नियम पाळत राष्ट्रीय प्रज्ञाशोध परिक्षा सुरळीत पार

28
✒️सचिन सरतापे(प्रतिनिधी म्हसवड-माण)मो:-9075686100

म्हसवड(दि.13डिसेंबर):-चार शैक्षणिक वर्षात पार पडणाऱ्या राष्ट्रीय प्रज्ञा शोध परीक्षा आज दि.13 डिसेंबर रोजी माण तालुक्यातील तालुका केंद्र दहिवडी येथे रयत शिक्षण संस्थेचे परशुराम महादेव कन्या विध्यालय दहिवडी,ता.माण,जि. सातारा येथे सुरळीत पार पडल्या.यावेळी कोविडं 19 ची पार्श्व भूमी लक्षात घेता सोशल डिस्टन्सीगचे योग्य पद्धतीने पालन करणेत आले या परीक्षेस बसलेल्या सर्व विध्यार्थ्याच्या पालकांकडून हमी पत्र लिहून घेतले होते ज्या विध्यार्थ्याच्याकडे हमी नव्हते त्या विध्यार्थ्याना परीक्षा केंद्रावर प्रवेश नाकारला गेला.

परीक्षा वेळेवर सुरु झाली त्यावेळी परीक्षार्थी विध्यार्थ्याना प्रवेश देताना विध्यार्थ्याच्या आयडेंटी कार्ड तपासले गेले त्याचे थर्मल स्कॅनीग आणि ऑक्सिजन लेव्हल तपासूनच विध्यार्थ्याना गेटच्या आत प्रवेश देणेत आला.कोविडं 19 च्या पार्श्वभूमीवर शाळा प्रशासनाकडून योग्य ती काळजी घेतलेबद्दल पालक वर्गातून समाधान व्यक्त करणेत आले.