चिमूर व्यापारी संघटना च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत प्रवीण सातपुते बहुमताने विजयी

32

🔹चिमूर मध्ये पहिल्यांदा मतदानद्वारे व्यापारी संघटनेची निवडणूक

✒️चिमूर(पुरोगामी संदेश नेटवर्क)

चिमूर(दि.14डिसेंबर):-चिमूर व्यापारी संघटना ची निवडणूक मतदान प्रक्रियेत पार पडली असताना अध्यक्ष पदाच्या निवडणुकीत प्रवीण सातपुते यांनी १८५ मते घेऊन बाजी मारीत विजयी गड काबीज केला. चिमूर व्यापारी संघटना ची एकूण मते ४४८ असताना या निवडणुकीत ३४७ मतदान झाले . अध्यक्ष पदाची निवडणुकीत छईलुसिंग राठोड यांना १३ मते, प्रवीण सातपुते यांना १८५ मते, श्याम बंग यांना १२३ मते व विनोद शर्मा यांना केवळ २४ मते मिळालेली असून प्रवीण सातपुते यांनी १८५ मते घेत ६२ मतांनी अध्यक्ष पदासाठी विजयी झाले.यामध्ये दोन मते अवैध ठरली.

चिमूर व्यापारी संघटना चे मावळते अध्यक्ष प्रमोद बारापात्रे यांच्या नेतृत्वात निवडणूक कार्यक्रम पार पडला असून या निवडणुकित निवडणूक निर्णय अधिकारी बाळकृष्ण झिंगरे, निवडणूक अधिकारी योगेश ढोने प्रशांत जोशी, उमेश गारुडे व इतर सहकाऱ्यांनी काम पाहिले. चिमूर व्यापारी संघटना ची निवडणूक शांततेत पार पडली.
मतदान पध्दतीने निवडणूक झाल्याने या निमित्ताने लोकशाही जिवंत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.