म्हसवड सिद्धन्नाथ यात्रा कालावधीत कोरोनाच्या पार्शवभूमीवर शहरात संचार बंदी लागू

31
✒️सचीन सरतापे(प्रतिनिधी,म्हसवड-माण)मो:-9075686100

म्हसवड(दि.14डिसेंबर):- भाविकांचे श्रद्धा स्थान असलेले म्हसवड,ता.माण,जि. सातारा येथील सिद्धनाथ माता जोगेशवरी यांना रथोत्सव हा 14 डिसेंबर ते 17 या कालावधीत संपन्न होणार होता परंतु आज कोरोना महामारीने तोंड वर काढल्याने महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री यांच्या आदेशानुसार महाराष्ट्रात कोणत्याही यात्रा किंवा मोठे धार्मिक सण होणार नाहीत.म्हसवड सिद्धनाथ यात्रेचा मुख्य दिवस 15 डिसेंबर रोजी येत असून या कालावधीत राज्यातून आणि परराज्यातून दरवर्षी लाखो भाविक येत असतात त्यामुळे सोशल डिस्टन्सीग पाळले जाणार नाही आणि त्यामुळे कोरोनाचा फैलाव मोठ्या प्रमाण होण्याची शक्यता असल्याने यात्रा कालावधीत माणच्या तहसीलदार बी.एस.माने यांनी दि.14 डिसें. ते 16 डिसें अखेर म्हसवड शहरात कलम 144 लागू केले.

असून या कालावधीत जमावबंदी आणि संचार बंदी लागू केली आहे. रस्त्यावर किंवा सार्वजनिक ठिकाणी पाच पेक्षा जास्त लोकांना एकत्र येण्यास मनाई करणेत आली आहे एकत्र येऊन साखर पेढे वाटप,गुलाल उधळण,फटाके फोडनेस मनाई केली आहे.दि.15 डिसें.रोजी म्हसवड शहरातील अत्यावश्यक सेवा वगळून सर्व दुकाने बंद राहणार असून अंत्यविधी,शासकीय कामकाज करणारे अधिकारी अथवा कर्मचारी यांना सदर आदेशातून वगळण्यात आले आहे.
परंतु सालाबाद प्रमाणे येणारी यात्रा हि गावकऱ्यासाठी आणि व्यापाऱ्या साठी महत्वाची आले या कालावधीत लाखो रुपयांची उलाढाल होते यावेळी मोठ्या प्रमाणात नुकसान होणार असल्याने काही लोकांनी यात्रा झालीच पाहिजे असा पवित्रा घेतल्याने प्रशासनाने कलम 144 लागू करून गावात येणारे सर्व मुख्य रस्ते बंद केले आहेत आणि दरवर्षी प्रमाणे याही वर्षी एकादशी दिवशी सिद्धनाथाचा रथ हा रथगृहातून बाहेर काढलेला आहे हा रथ पण प्रशासनाने चारीबाजूनी पत्रे लावून सील केला आहे.
शहरात यात्रा कालावधीत काही अनुचित प्रकार घडू नये म्हणून मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करणेत आला आहे.परंतु गेले पाच दिवस झाले व्यापारी वर्ग,गावकरी आणि भाविक संभ्रमावस्थेत आहेत की संचार बंदी लागू केली असली तरी शहरातील दुकाने बंद ठेवायची कि चालू ठेवायची कोणालाही विश्वासात घेऊन निर्णय न झाल्याने व्यापारी वर्गात कमालीची नाराजी दिसून येत आहे त्यात रथ हा दरवर्षी प्रमाणे गावातून प्रदक्षिणा करणार नसल्याने आणि यात्रेवर मर्यादा आल्याने भाविक भक्तांमध्येपण नाराजी आहे.यंदाची यात्रा होत नसल्याने व्यापारी वर्गाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे आधीच कोरोना काळात लोकडाऊन होऊन नुकसान सोसले आहे आणि यात्रा रद्द झालेने नुकसान होत आहे.