यात्रा कालावधीत म्हसवड शहरात कलम 144 चे काटेकोर पालन

36
✒️सचिन सरतापे(प्रतिनिधी म्हसवड-माण)मो:-9075686100

म्हसवड(दि.15डिसेंबर):-कोरोना महामारीचा कारणाने सालाबादप्रमाणे येणारी म्हसवड सिद्धनाथ यात्रा हि प्रशासनाच्या आदेशानुसार रद्द करणेत आली.कोरोनाचा फैलाव होऊ नये म्हणून शासन आदेशानुसार माण च्या तहसीलदार बी.एस.माने यांनी यात्रा कालावधीत 14 डिसें. 2020 ते 16 डिसें.2020 अखेर म्हसवड शहरात कलम 144 लागू केले असून याची काटेकोर अमलबजावणी आज म्हसवड शहरात पोलीस यंत्रणेकडून पाहायला मिळाली. आज यात्रेचा मुख्य दिवस असलेने पोलिसांनी शहरात येणाऱ्या सर्व प्रमुख रस्त्यावर बेरेगेट्स लावून येणाऱ्या सर्व वाहनांची कसून तपासणी चालू केली आहे.शहरात संचारबंदी व जमावबंदी लागू असले कारणाने जे कोणी विनाकारण शहरात फिरताना दिसतायत त्यांना दंड करणेत येत आहे.

शहरात कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये म्हणून मोठा पोलीस बंदोबस्त ठेवणेत आला आहे.पोलीस यंत्रणेकडून कोणत्याही सबबविवर वाहन सोडले जात नसून संशया स्पद वाहनांची बाजूला घेऊन तपासणी केली जात आहे.या सर्व कामी नगरपालिका कर्मचारी या पोलीस आणि शासकीय यंत्रणेबरोबर काम करत असून त्याचे मोठे सहकार्य पोलिसांना लाभत आहे.गावकरी आणि मानकरी यांनी रथ हा गावातून फिरवायचा असा पवित्रा घेतला होता या पार्श्वभूमीवर मंदिर परिसर जवळ आणि रथगृहाजवळ आर.सी.पी.चे जवान आणि पोलीस मोठ्या प्रमाणात तैनात करणेत आलेत.त्याच बरोबर नगरपालिकेचे अग्निशमन दल आरोग्य खात्याची रुग्णवाहिका सुद्धा त्याठिकानी ठेवणेत आली आहे.
शहरातील सर्व प्रमुख रस्ते बंद असून आज संपूर्ण म्हसवड शहरातील व्यापारी दुकाने पूर्णपणे बंद आहेत.कोणीही दुकान उघडण्याचा प्रयत्न केलातर त्यास दंड केला जात आहे.आजारी पेशन्ट आणि रुग्णवाहिका यांना पोलिसांकडून सहकार्य होत असून आज खडा पहारा देत असताना पोलीस कर्मचारी हे मिळेल त्या ठिकाणी उभे राहून आपली भूख नाष्टा करून भागवताना दिसतायत आणि आपली ड्युटी चोख बजावयत आहेत.आज आपल्या शहरातील सिद्धनाथ माता जोगेशवरी याची यात्रा होत नसलेले भाविक भक्तांच्या भावना दुःखी होत असून त्याच्यातून हळहळ व्यक्त होत आहे.भाविकाच्याकडून बोलले जात आहे प्रथमच म्हसवडची सिद्धनाथ यात्रा रद्द झाली आहे.