उदयकुमार पगाडे “राष्ट्रीय समाजसेवा रत्न-2020” पुरस्काराने सन्मानित

    41

    ?उपविभागीय अधिकारी, ब्रम्हपुरी यांच्या हस्ते पुरस्कार वितरण

    ✒️रोशन मदनकर(उप संपादक)मो:-8888628986

    ब्रम्हपुरी(दि.15डिसेंबर):-“दिल्ली सरकार आणि जागतिक मानवाधिकार संघटना” मार्फत भारतातील विविध कार्यक्षेत्रातील लोकांना उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्धल “राष्ट्रीय सेवारत्न पुरस्कार” हा सन्मान देऊन गौरविण्यात येत असतो.परंतू, या वर्षी कोरोना विषाणूच्या वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता, लॉकडाऊनमूळे दिल्ली या शहरामध्ये मध्ये होणारा पुरस्कार सोहळा नियोजित तारखेला होऊ शकला नाही..म्हणून सदर पुरस्कार संघटनेतील मंडळींनी पोस्टाने पुरस्कार पाठवून, तालुका जिल्हा स्तरावरील वरिष्ठ शासकीय अधिकाऱ्यांच्या हस्ते पुरस्कार वितरीत करण्याचे ठरविले.

    या “राष्ट्रीय समाजसेवा रत्न-2020” या पुरस्काराचे मानकरी चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रम्हपुरी मधील युवा समाजसेवक नावाने ओळख असलेले, उदयकुमार सुरेश पगाडे (26) हे ठरले असून, त्यांना दि.15/12/2020 मंगळवारला आपल्या ब्रम्हपुरीचे उपविभागीय अधिकारी “मा.संदीप भस्के साहेब” यांच्या हस्ते पुरस्कार स्वरूपात ट्रॉफी, सन्मानपत्र, आणि मेडल देऊन गौरविण्यात आले. व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.