अत्याचार विरोधी कृती समिती A.V.K.S. नासिकच्या वतीने मा. सुदामजी वाघमारे ” ऊतरंड” सिनेमा फेम यांचा जाहिर सत्कार संपन्न

29

✒️शांताराम दुनबळे(नाशिक,जिल्हा प्रतिनिधी)मो:-9960227439

नाशिक(दि.16डिसेंबर):-ऊतरंड चित्रपटाचे निर्माते, अस्सल आंबेडकरी बाणा जोपासत विद्रोही संस्कृतीचे निर्माणासाठी अग्रेसर असणारे “भिमयोध्दा- दिग्दर्शक सुदामजी वाघमारे,मुंबई ” यांचा जाहिर सत्कार दि.१५ डिसे.२०२० रोजी सायं.६ वा. , सिम्बॉल ऑफ नाॅलेज, डाॅ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, शालीमार, नासिक येथे अत्याचार विरोधी कृती समितीच्या (A.V.K.S.) वतीने करण्यात आला.

यावेळी समितीचे मुख्य निमंत्रक राहूल तुपलोंढे, नशाबंदी मंचचे अविनाश आहेर, लोकमोर्चा संघटनेचे सुभाष मुंढे, महाराष्ट्र कामगार सेनेचे सागर जाधव, पत्रकार राम ठाकूर ,शिवाजी गायकवाड दैनिक महाभारत पञकार व पोलीस टाईम्स न्युज संपादक शातांरामभाऊ दुनबळे , आदिसह पदाधिकारी उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक राहुल तुपलोंढे यांनी केले. तर सूत्र संचलन अविनाश आहेर यांनी तर आभार प्रदर्शन सुभाष मुंढे यांनी केले.