सोन्याबाई ठक्करवाड विद्यालयात आरोग्य विभागाच्या वतीने सिकलसेल आजाराची दिली माहिती

41

✒️अशोक हाके(बिलोली,तालुका प्रतिनिधी)मो:-9970631332

बिलोली(दि.16डिसेंबर):-तालुक्यातील हुनगुंदा येथील सोन्याबाई ठक्करवाड माध्यमिक विद्यालयात येथील उपकेंद्राचे डाँ. श्वेता चिंतले ( सुर्यवंशी ) यांनी दि.14 डिसेंबर रोजी विद्यार्थांना सिकलसेल आजारा बाबत सविस्तर माहिती दिली.सिकलसेल आजारा बाबत आरोग्य विभागाच्या वतीने दि.11 डिसेंबर ते 17 डिसेंबर या कालावधित सिकलसेल आजाराचे नियंत्रण, मार्गदर्शन व निदान या बाबत माहिती देणार आहेत. याच अनुषंगाने सोन्याबाई ठक्करवाड माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थांना डाँ.श्वेता चिंतले (सुर्यवंशी ) यांनी माहिती दिली.

ताप येणे, छातीत दुखणे, श्वासोच्छवासात त्रास होणे थकवा, अशक्त पणा,निस्तेज वाटणे, पोट दुखी, सांधे दुखी, डोके दुखी व धाप लागने आदी लक्षणे आढळल्यास त्वरीत जवळच्या रुगणालयात तपासून घेण्यास सांगितले. यावेळी आरोग्य सेविका सी.के.करडे, आरोग्य सेवक जी.डी.ढगे, आशा वर्कर मराठे, संगमकर आदी उपस्थित होते.