प्राथमिक शिक्षक मतदानापासून वंचित

30

🔹शिक्षक आमदार निवडणुकीत मतदान करण्याची कवडू लोहकरे यांची मुख्यमंत्री यांचे कडे मागणी

✒️चिमुर(पुरोगामी संदेश नेटवर्क)

चिमुर(दि.16डिसेंबर):-भारतातील प्रत्येक नागरिकाला संविधानाच्या कलम ३२६ नुसार मतदानाचा अधिकार प्राप्त झाला आहे. शिक्षकांचे प्रश्न सोडवण्यासाठी व समस्या सोडविण्यासाठी शिक्षक मतदारसंघाची निर्मिती करण्यात आली आहे. याच मतदारसंघातून शिक्षक आमदार विधानपरिषदेच्या माध्यमातुन निवडुन येतात. शिक्षक आमदार शिक्षकांच्या प्रश्नाबाबत गांभिर्याने घेऊन शिक्षकांच्या समस्या विधानपरिषदेत मांडतात. शिक्षकांच्या प्रश्नांना वाचा फोडतात.

परंतु शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत सर्वच शिक्षक मतदान करु शकत नाही. फक्त माध्यमिक शिक्षक , उच्च माध्यमिक शिक्षकच मतदान प्रकियेत भाग घेतात. मात्र प्राथमिक शिक्षक मतदानाच्या प्रक्रियेत सहभागी होऊ शकत नाही. जिल्हा परिषद प्राथमिक व खाजगी प्राथमिक शिक्षक यांना मतदान करता येत नाही. त्यामुळे शिक्षकांमध्ये मोठ्या प्रमाणात असंतोष निर्माण झाला आहे. शिक्षकांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी पसरली आहे.

मतदान प्रक्रीयेत संविधानानुसार समान नागरिकत्वाचा स्विकार केला आहे. प्राथमिक शिक्षकांना मतदानापासून वंचित ठेवु नये. त्यांनासुद्धा मतदानाचा अधिकार द्यावा. अशी मागणी राष्ट्रीय ओ बी सी महासंघ चिमुर चे कोषाध्यक्ष कवडू लोहकरे यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांचे कडे करण्यात आली.

कवडू लोहकरे यांचे मत

“” शासनाने मतदान प्रक्रियेत भेदभाव करु नये. मतदान करने आपला अधिकार आहे. एकाला मतदानाचा अधिकार व दुस-याला नाही. मतदानापासून वंचित ठेवण्याचा डाव आहे. “”

कवडू लोहकरे

कोषाध्यक्ष– राष्ट्रीय ओ बी सी महासंघ चिमुर