भिमसैनिक विमानाने भिमा कोरेगांवला

    37

    ✒️लेखक:-समाज भुष आयु.सयाजी वाघमारे(मो:-70394 83438)

    त्या दिवशी सेक्टर ८ टारझन पॉईंटला सायंकाळच्या वेळेला जमणाऱ्या आमच्या टोळक्या मध्ये चर्चेला विषय होता, दुपारी टि.व्ही. च्या बातम्यात दाखविलेले छोटेखानी सहा आसनी विमान आणि त्याचा निर्माता होता. कॅप्टन अमोल यादव जो आमच्या चारकोप – कांदिवलीचा रहिवाशी आहे.त्याने बिल्डिंगच्या गच्चीवर विमान तयार केले. विमानाचे प्रात्यक्षिक ह्या रस्त्यावर करित असल्याचे आम्ही पाहिलेले आहे. असे सांगणारे टोळक्यात दोघेजण होते. त्यामूळे त्या दिवशी छोट्या विमानाचाच विषय चर्चेस होता. माझ्या डोक्यात मात्र यादव हे नाव घोळत होते. कारण प्रा. एस. एस. यादव हे माझ्या परिचयाचे असुन ते चारकोप- कांदिवली मध्येच वास्तव्याला असल्याचे मला माहित होते.

    कॅप्टन अमोल यादव म्हणजे सरांचा दोन नंबरचा मुलगा ही बातमी लवकरच मिळाली त्या दिवसा पासुन सरांच्या घरी जावुन कॅप्टन अमोलची भेट घेन्याची ओढ लागली होती.अगदी अन अपेक्षितपणे रविवारी दिनांक १३/१२/२०२० रोजी माझे स्नेही अशोक आहिरे यांचा फोन आला. आज दुपारी ४.०० वाजता सरांच्या घरी आपल्याला जाण्याचा प्रस्ताव ऐकताच मी होकार दिला.

    ४.०० वाजता सरांनी आमचे स्वागत केले.अगदी साधा टी शर्ट पारिधान केलेला, ताटात पाण्याचे ग्लास घेवुन आलेल्या तरुणाच्या दंडाला धरुन, सरांनी हा अमोल म्हणून उच्चार करताच, आमच्या दोघांचे डोळे विस्फारले गेले. कारण अगदी अलिकडे लातुरच्या विमान तळावर आपल्या छोटेखानी विमानाचे उड्डाण प्रात्यक्षित दाखविताना कॅप्टन अमोलला मी सुटात पहिले होते.आणि आज समोर अमोल दिसणारा अमोल फार वेगळा होता.

    आमची उस्तुकता ओळखून कॅप्टन अमोलने त्याच्या विमान निर्मिती आणि भविष्यातील प्रकल्पावीषयी तो भरभरुन बोलत होता. त्याची चालू असलेली धडपड, दिल्लीत असलेले आपले आपले मंत्री आणि त्यांची झेप , उच्च पदस्थ असलेले आपले आधिकारी त्यांचे असलेले अनुभव ऐकून मन हेलावून गेले.त्याच्या प्रयत्नाला आपण काय मदत करु शकतो ? म्हणून मला दिनवाणे वाटू लागले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकासाठी इंदू मिळची जागा अम्हाला विकत द्या ! असा प्रस्ताव आयु चंद्रकांत भंडारे (ज्यांचे मुळ स्वप्न होते) त्यांनी शासनाला दिला होता. कारण भंडारेना पुर्ण विश्वास होता. माझ्या तमाम समाज बांधवांचे स्वप्न पुर्ण करण्यासाठी माझा समाज वाटेल ते करिल.

    प्रस्थापितांचा वर्ग आणि त्यांचे सरकार अपल्यापैकी एखाद्दा घर भेद्याला बंगला, गाडी, घोडा इत्यादी घेण्याला मदत करिल, परंतू समाजासाठी एखादी योजना घेवुन कोणी काही करु म्हटल्यास त्याला उभे सुद्धा करणार नाही. हे ओळखून आपल्या समाजाने कॅप्टन अमोल यादव यांचे स्वप्न हे त्यांचे एकट्याचे नाही. हे स्वप्न आपल्या सर्वांचे आहे. असे समजून हा प्रकल्प प्रत्यक्षात उभा करण्यासाठी आपल्या प्रत्येकाची मदत, सुचना, योजना कार्यक्रम घेवुन पुढे आले पाहिजे.