शासनाच्या डोळ्यात धूळ फेकून खड्डे भरण्याच्या नावाने लाखो रूपयांचा केला चुरडा

34

🔺पालकमंत्री व लोकप्रतिनिधी चे दुर्लक्ष

✒️नेवासा(पुरोगामी संदेश नेटवर्क)

नेवासा(दि.18डिसेंबर):- रस्त्यांच्या दुरुस्तीच्या नावा खाली ठेकेदारांनी शासनाची फसवणूक चालवली असून,नेवासा फाटा ते शेवगाव रस्त्यावरील खड्डाचे काम अत्यंत निकृष्ट दरजाचे काम करणारे ठेकेदार असून, यांच्यावर ठोस कारवाही करून खड्डे भरण्याच्या नावाने चाललेली लाखो रुपयांची लयलूट थांबवून दर्जेदार रस्ते व्हावेत. त्या खड्ड्यांमध्ये अतिशय कमी प्रमाणात डांबर वापरले आहे.खड्डे बुजविण्याचे काम योग्य पध्दतीने न झाल्यास रस्त्यावर टाकण्यात येणारी लेयर देखील जास्त काळ टिकणार नाही. “पुढे खड्डे बुजविण्याचे काम चालू आहे. परंतु मागिल खड्डे उखडण्यास सुरूवात झाली आहे”.

रस्त्यासाठी सुमारे लाखों रुपये निधी मंजूर झालेला आहे. एवढा खर्च करुन देखील रस्ता चांगला न झाल्यास पुढील वर्षी हीच समस्या उद्भवणार आहे. अशा निकृष्ट कामामुळे जनतेच्या पैश्याची एकप्रकारे उधळपट्टी चालू असल्याचे नवले यांनी म्हंटले आहे. काम चांगले होण्यासाठी दखल न घेतल्यास अभियंत्यास खुर्चीला बांधून निकृष्ट काम होऊ देणार नसल्याचे संघटनेच्या वतीने इशारा देण्यात आला आहे. नेवासा फाटा ते शेवगांव या रस्त्यावर खडी,डांबर चांगल्या कोलीटीचे न वापरले मुळे तो रस्तावरील पुन्हा खड्डे उघडे पडले आहेत. या रस्ता मध्ये प्रचंड मोठा प्रमाणात भ्रष्टाचार हा ठेकेदार,आधिकारी यांच्या सगम मतांनी झाला आहे.नेवासा फाटा ते शेवगाव रस्त्यावर खड्डे भरण्याच्या नावाखाली लाखो रुपयांचा चुराड केला जात आहे.या कामाकडे अहमदनगर जिल्हाचे पालकमंत्री व लोकप्रतिनिधी दुर्लक्ष केले आहे.

“खड्याचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे असुन संबंधीत ठेकेदार व अधिकारी यांच्या मिलीभगत मुळे या कामात प्रचंड मोठा भ्रष्टाचार झाला आहे.या कामाची चौकशी करण्यात यावा व संबंधित ठेकेदांरावर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा”
—कमलेश बाबासाहेब नवले पाटील
संस्थापक अध्यक्ष जीवन ज्योत फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य

“या रस्त्याचे कामात मोठया प्रमाणात गैरप्रकार करण्यात येत आहे. परंतु कोणताही अधिकारी रस्त्याचे कामाची पाहणी करण्यासाठी येत नाही. ठेकेदार व अधिका-यांनी हातमिळवणी केली आहे”
—नरेंद्र नवथर(सर)
छत्रपती युवा सेना महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष