कांग्रेस अल्पसंख्याक कमिटी चेवतीने राष्ट्रीय अल्पसंख़्याक दिनाचे आयोजन

35

✒️इकबाल पैलवान(हिंगणघाट प्रतिनिधी)मो:-9923451841

हिंगणघाट(दि.18डिसेंबर):-कांग्रेस अल्पसंख्याक कमिटीचेवतीने राष्ट्रीय अल्पसंख़्याक दिनाचे आयोजन सेवाग्राम येथील सनशाइन हाइस्कूल तसेच जूनियर कॉलेज सेवाग्राम (वर्धा) येथे आयोजित करण्यात आला.

यावेळी प्रमुख अतिथि म्हणून वर्धा जिल्हा कांग्रेस कमिटीचेअध्यक्ष मनोज चांदुरकर , वर्धा जिल्हा अल्पसंख्याक कांग्रेस कमिटीचे अध्यक्ष शब्बीर पठाण, हिंगणघाट तालुका कांग्रेस कमिटीचे अध्यक्ष इकबाल मोहम्मद, वर्धा जिल्हा कांग्रेस कमिटी उपाध्यक्ष श्रीमती तबस्सुम आज़मी इत्यादि मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमात सानिया शेख , सालेह शेख , नामिरा शेख, कामरान खान , अबोली मेंढे, कौसर पठान , आलिया खान, सनोबर खान, मेहविश शेख , अमन शेख आदि विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षा तसेच विविध परीक्षेत प्रावीण्यप्राप्त केल्याने मान्यवरांचे हस्ते सन्मान करण्यात आला.कार्यक्रमाचे यशस्वितेसाठी शालेय शिक्षक तसेच कर्मचारीवृंद यांचा विशेष सहभाग लाभला.