सु-लक्ष्मी बहुद्देशिय सेवाभावी संस्थाच्या वतीने सत्यवान रोडे यांना उत्कृष्ट सेवेबद्दल सेवा गौरव पुरस्कार जाहीर

35

✒️अतुल बडे(परळी प्रतिनिधी)मो:-9096040405

परळी वैजनाथ(दि.19डिसेंबर):-सु-लक्ष्मी बहुद्देशिय सेवाभावी संस्था औरंगाबाद व माणुसकी रुग्णसेवा समुह शासकीय रुग्णालय घाटी यांच्या संयुक्त विद्यमाने चौथ्या वर्धापन दिनानिमित्त सत्यवान रोडे यांना सेवा गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. हा पुरस्कार सोहळा दि. ३०-१२-२०२० बुधवार रोजी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार वितरण सोहळा मौलाना आझाद संशोधन केंद्र, टीव्ही सेंटर औरंगाबाद येथे संपन्न होणार आहे.

माणुसकी चा चौथा वर्धापनदिनाच्या कार्यक्रमाची रूपरेषा दुपारी १०:०० वाजता महारक्तदान शिबीर शासकीय रत्त पेढि साठि ०१:०० वा. मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. समाजातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या ४१ व्यक्तीचां गुण गौरव या कार्यक्रमात करण्यात येणार आहे. त्यापैकी संपूर्ण नाव : सत्यवान प्रकाश रोडे, जन्म दिनांक: 10/05/१९८५, लिंग :पुरुष पत्ता : जिरेवाडी ता.परळी वैजनाथ, जि.बीड कार्यरत असलेल्या कार्यालयाचे नाव: नगर परिषद येथे लिपिक पदावर कार्यरत आहेत. यापूर्वी मिळालेला पुरस्कार: हरिसुख प्रतिष्ठान, पुरोगामी पत्रकार संघाचे वतीने व इतर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

आपले उल्लेखनीय कार्य: सामाजिक क्षेत्रात तसेच कोरोना लाँकडाऊन काळात उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल परळी नगर परिषदेचे कर्मचारी सत्यवान प्रकाश रोडे यांना औरंगाबाद येथील संस्थेच्या वतीने सेवा गौरव पुरस्कार नुकताच जाहीर झाला आहे. 30 डिसेंबर रोजी औरंगाबाद येथे मान्यवरांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण होणार आहे.सत्यवान प्रकाश रोडे हे परळी नगरपरिषद वसुली विभागात काम करतात शहरातील सामाजिक क्षेत्रातील नेहमी अग्रेसर आहेत कोरणा विषाणूच्या प्रादुर्भाव वाढल्यानंतर प्रादुर्भाव वाढल्यानंतर नगर परिषद कर्मचारी यांची जबाबदारी वाढली होती. परळी नगर परिषदेच्या वतीने शहरातील जनतेपर्यंत कोरोना विषाणूपासून बचाव करण्यासाठी सत्यवान प्रकाश रोडे हे लोकांपर्यंत जाऊन जनजागृती करीत होते. त्यांना कोरोना संसर्ग होऊ नये यासाठी सर्व प्रकारच्या उपाययोजना ते समजावून सांगत होते.

त्यांच्या या कार्याला लोकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. नगर परिषदेचे लिपिक सत्यवान प्रकाश रोडे यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर समाजासाठी व आरोग्यासाठी नागरिकांच्या. सुरक्षेसाठी आहोरात्र केलेल्या कार्य करणाऱ्या रोडे यांचा गौरव करण्यात आला. कोरोनाच्या संकटात सत्यवान रोडे यांनी प्रभाव सुरक्षा समिती कोरोना कोवीड 19 विषाणुजन्य परिस्थितीची माहिती विभाग नगर परिषद परळी वैजनाथ यांच्या वेळोवेळी सुचनांचे काटेकोर पालन करत.प्रभाग क्र.11 मध्ये बाहेरून आलेल्या नागरिकांना व स्थानिक नागरिक जनजागृती करणे, व्यक्तीची नाव नोंदणी करणे, नोंदणी करून. गरजेनुसार दावाखान्यात घेऊन जाणे, त्यांना होम काँरंटाईन करणे, दररोज त्यांच्यावर घराबाहेर निघु नये म्हणून आवाहन करणे, घरोघरी जाऊन जनजागृतीच्या माध्यमातून माहिती देणे, नगर परिषदेचे गटनेते वाल्मिक अण्णा. कराड, नगराध्यक्षा सौ.सरोजनीताई हालगे, मुख्याधिकारी डॉ. अरविंद मुंडे यांच्या सुचनांच्या पालन करत प्रभाग क्रमांक 11मध्ये कोरोनाला दूर ठेवल्याबद्दल व कर्मचाऱ्यांच्या भूमिका चांगल्या प्रकारे बजावल्याबद्दल व कोरोना कोविड-19 या संकटांत काम केले.

कोरोना काळात उत्कृष्ट सेवा बजावल्याबद्दल सत्यवान प्रकाश रोडे यांना पुरोगामी पत्रकार संघाच्यावतीने सन्मानित करण्यात आले होते. तसेच परळी शहरातील हरिसुख प्रतिष्ठानच्या वतीने ही त्यांना कोरोना योद्धा पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. सत्यवान रोडे यांच्या कार्याची दखल घेऊन औरंगाबादेतील औरंगाबादेतील सु लक्ष्मी बहुउद्देशीय सेवाभावी संस्था माणुसकी रुग्णसेवा समूह शासकीय रुग्णालय घाटी यांच्या चौथ्या वर्धापन दिनानिमित्त त्यांना सेवा गौरव पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. येत्या 30 डिसेंबर रोजी डिसेंबर रोजी मान्यवर पाहुण्यांच्या हस्ते वितरण सोहळा पार पडणार आहे हा पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल सत्यवान रोडे यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.