12 वर्षानंतर जालना येथील स्टील कारखानदारांना सोन्याचे दिवस

55

✒️अतुल उनवणे(जालना,जिल्हा प्रतिनिधी)मो:-9881292081

जालना(दि.19डिसेंबर):-शहरातील स्टील उद्योगाला एक तपानंतर पहिल्यांदाच सोन्याचे दिवस आले आहेत. सध्या बांधकामसाठी लागणाऱ्या लोखंडी सळ्यांचे भाव 12 वर्षानंतर 50 हजार प्रतिटन एवढे झालेत. लॉकडाऊन काळात मोठ्या ससंकटात सापडलेल्या या उद्योगाला आता मागणी वाढल्याने सुगीचे दिवस आलेत.

देशात लॉकडाऊन नंतर पूर्णपणे बंद असलेल्या बांधकामाच्या व्यवसायात उभारी आल्याने बांधकामासाठी लागणाऱ्या सळ्यांची मागणी वाढली आहे.सळ्यांच्या उत्पादनासाठी जालना चे नांव महाराष्ट्र सह भारत देशात गाजलेले आहे.तसेच काही ठराविक कंपनीच्या मालाला परदेशातही मागणी आहे.

गेल्या 8 महिन्यात या उद्योगासाठी लागणाऱ्या कच्च्या मालाची आवकदेखील घटली आहे. परिणामी सळ्यांच्यासाठी लागणारा प्रक्रिया खर्च वाढल्याने देखील ही भाववाढ झाल्याचे उद्योजकांकडून सांगण्यात येत आहे. जालना शहरात 14 मोठे स्टील उद्योग असून 22 लहान रिरोलिंग मिल आहेत. या मिलमध्ये बांधकामासाठी वेगवेगळ्या आकाराचे लोखंडी बार तयार केले जातात.