अज्ञान, अंधश्रद्धा आणि अस्वच्छतेच्या नायनाटासाठी जीवन खर्ची घातलेले संत गाडगेबाबा

29

आमची भारतभूमी ही महान संतांची भूमी आहे. या भारत भूमीवर अनेक महान संतांचा जन्म झाला आहे. त्या सर्व संतांपैकी एक आहेत – संत गाडगेबाबा. गाडगेबाबा म्हणून ओळखले जाणारे महाराष्ट्रातील एक कीर्तनकार, संत आणि समाजसुधारक सुद्धा होते.

त्यांनी गरीब राहणी स्वीकारली होती. संत गाडगेबाबा यांना सामाजिक न्याय, सुधारणा आणि स्वच्छता या विषयात जास्त रुची होती. ते नेहमी सामाजिक न्याय देण्यासाठी गावोगाव फिरत असत. संत गाडगेबाबा यांनी २० व्या शतकातील आंदोलनामध्ये सहभाग घेतला होता.

जन्म-

संत गाडगेबाबा यांचा जन्म २३ फेब्रुवारी, १८७६ साली अमरावती जिल्ह्यातील शेणगाव येथे झाला होता. हे धोबी समाजातील होते. त्यांचे संपूर्ण नाव डेबूजी झिंगराजी जानोरकर असे होते.

त्यांच्या वडिलांचे नाव झिंगराजी आणि आईचे नाव सखुबाई होते. त्यांच्या आईने त्यांचे नाव डेबूजी असे ठेवले होते. त्यांचे वडील हे शेतीचे काम करून उपजीविका करत असत. त्यांची देवावर अत्यंत श्रद्धा होती.
परंतु काही वर्षानंतर गाडगेबाबांच्या वडिलांचा मृत्यू झाला. त्यांच्या घरची परिस्थिती बिकट असल्यामुळे ते मामाची गुरु सांभाळत. तसेच शेतीची खताची कामे सुद्धा करत.

दारिद्र्य आणि जातीभेद दूर
संत गाडगेबाबा यांनी जन स्वतःचे जीवन कीर्तन करत खेडोपाडी घालविले. त्यांच्या अंगात नेहमी घोंगडीचा अंगरखा आणि हातात मातीचे गाडगे असायचे.

म्हणून ते गाडगेबाबा या नावाने प्रसिद्ध झाले. जागृतीसाठी संत गाडगेबाबा यांनी समाजातील दारिद्र्य आणि जातिभेदांमुळे निर्माण होणारी विषमता तसेच देवभोळेपणा याच्यावर त्यांनी आपल्या कीर्तनातून वार केलेत.

देव दगडात नसून तो माणसात आहे. त्यासाठी माणूस घडविणे हेच आपल ब्रीदवाक्य असायला हवं. त्यासाठी शिक्षण घ्यायला हवं असे त्यांचे मत होते.

कीर्तनाचा मार्ग-

संत गाडगेबाबा यांनी समाजातील अज्ञान, अंधश्रद्धा, भोळ्या समजुती आणि अनिष्ट रूढी व प्रथा दूर करण्यासाठी आपले संपूर्ण आयुष्य वेचले. त्यासाठी त्यांनी कीर्तनाच्या मार्गाचा अवलंब केला.

संत गाडगे महाराजांनी आपले तन – मन – धन जनसेवेत वेचण्यासाठी आणि लोककल्याण करण्यासाठी घालविले. त्यांनी लोकजीवन उजळण्यासाठी स्वतः हातात खराटे घेऊन रस्ते साफ करत संपूर्ण महाराष्ट्रभर फिरले.

त्यांनी खेडोपाडी आणि शहरोशहरी जाऊन कीर्तन ऐकली. त्यांनी शिक्षणाचे आणि स्वच्छतेचे महत्व लोकांना पटवून दिले. तसेच साक्षरतेचा प्रसार केला. गाडगे महाराज हे जास्त शिकले नाही होते.
परंतु संतांचे अभंग तोंडपाठ होते. ‘गोपाला गोपाला देवकीनंद गोपाला’ असा गाजर म्हटल्यानंतर ते लगेच हरिपाठ म्हणत असत.

धर्मशाळा-

संत गाडगे महाराज यांनी देहू, आळंदी, पांढरपूर, नाशिक आणि मुंबई येथे धर्मशाळा बांधल्या. त्यांनी अनेक जनकल्याणाची कामे राबवली आणि यशस्वीरित्या पार पाडली.

जाती, धर्म आणि वर्ण हा भेद त्यांच्याजवळ नव्हता. तसेच ते समतेचे पुरस्कर्ते होते. त्यांच्या मनात लोक कल्याणाची भावना होती.

स्वच्छता मोहीम सुरु
संत गाडगेबाबा यांच्या सन्मानार्थ सन २००० – २००१ मध्ये संत गाडगेबाबा गाव स्वच्छता मोहीम सुरु केली. या मोहिमेतून देशातील सर्व लोकांना स्वच्छतेचे महत्व पटवून दिले. तसेच जनजागृती सुद्धा केली. भारत सरकारने त्यांच्या स्मरणार्थ अनेक पुरस्कार जाहीर केले.

निधन-

असेच एक दिवस वारकऱ्यां सोबत कीर्तन करीत जात असताना २० डिसेंबर, १९५६ साली अमरावतीत त्यांचे निधन झाले. त्यांनी आपले जीवन समाज सुधारणेत घालविले असे हे महान संत गाडगेबाबा होते.
संत गाडगे महाराज हे भारतीय इतिहासातील एक महान संत होते. तसेच ते महाराष्ट्रातील प्रमुख समाज सुधारकांपैकी एक होते. ते लोकांचे प्रश्न समजून घेणारे आणि गरीब व गरजू व्यक्तींसाठी झटणारे संत होते त्याची आज पुण्यतीथी निमित्त विनम्र अभिवादन.

✒️लेखक:-विनोद सुरेश रोकडे
धरणगाव धोबी समाज युवक शहर प्रमुख व शिवसेना कार्यालय प्रमुख धरणगाव
मो:-९५४५३९७१७२