कांग्रेसची उमेदवारी पाहिजे का?, मग जमा करा 1500 रुपये

32

🔹प्रदेश सरचिटणीस ऍड.गणेश पाटील यांच्या पत्रावर खमंग चर्चा

✒️अमरावती(पुरोगामी संदेश नेटवर्क)

अमरावती(दि.20डिसेंबर):-कांग्रेसची उमेदवारी पाहिजे का?, मग जमा करा 1500 रुपये (20 डिसेंबर)- जिल्ह्यातील भातुकली, तिवसा,देवनी, नांदगाव खंडेश्वर नगर पंचायत निवडणुकीकरिता कांग्रेसची उमेदवारी पाहिजे असल्यास कांग्रेस प्रदेश कार्यालयात 1500 रुपये उमेदवारी अर्ज मिळण्याकरिता जमा करावे लागेल, अश्या आशयाचे पत्र महाराष्ट्र प्रदेश कांग्रेस कमिटीचे सरचिटणीस एड. गणेश पाटील यांनी संबंधितांना दिल्यामुळे सामान्य आर्थिक स्थिती असणाऱ्या कार्यकर्त्यांमध्ये उलट सुलट चर्चेला उधाण आले आहे.

अमरावती जिल्ह्यातील भातकुली, देवनी, तिवसा, नांदगाव खंडेश्वर नगर पंचायतच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत, या निमित्ताने प्रदेश कांग्रेस कमिटीने भातकुली व तिवसा करीता धनंजय देशमुख व देवनी ,नांदगाव खंडेश्वर करीता सुनिल कोल्हे यांचेकडे निरीक्षक पदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

याच पत्रामध्ये नगर पंचायत निवडणूक लढण्याची इच्छा असेल तर अर्जासोबत एक हजार रुपये अर्ज शुल्क व पक्षाचे मुखपत्र शिदोरी वर्गणी पाचशे रुपये असे एकूण एक हजार पाचशे रुपये जमा करावे, तसेच अनुसूचित जाती,अनुसूचित जमाती व महिला इच्छुक उमेदवार यांना एक हजार रुपये जमा करून प्रदेश कार्यालयात जमा करण्याबाबत पत्रात स्पष्ट उल्लेख आहे.