काँग्रेस युवा शहराध्यक्ष,शेख जहीर यांचा एमआयएम मध्ये प्रवेश, काँग्रेसला मोठा झटका

32
✒️अतुल बडे(परळी प्रतिनिधी)मो:-9096040405

परळी(दि.20डिसेंबर):-शहरातील युवा काँग्रेस शहर अध्यक्ष शेख जहीर यांनी आज औरंगाबाद येथील एमआयएम मध्ये प्रवेश करण्यात आला युवा शहराध्यक्ष जहीर यांनी काँग्रेसमध्ये अनेक कार्य केले शेख जहीर यांनी एमआयएम मध्ये प्रवेश केल्याने काँग्रेस यांना झटका बसल्याने दिसून येत आहे तर एमआयएम मध्ये प्रवेश केल्याने युवा मध्ये चर्चेचा विषय बनला आहे आज औरंगाबाद येथील दारुसलाम वर इम्तियाज जलील यांच्या हस्ते मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन ( एमआयएम ) मध्ये प्रवेश करण्यात आला युवा काँग्रेसचे शहराध्यक्ष जहीर यांनी केल्याने परळी शहरांमध्ये एकीकडे एम आय एम मध्ये प्रवेश केल्याने अभिनंदन होत आहे तर दुसरीकडे काँग्रेसला मोठा झटका बसल्याने दिसून येत आहे.

. शेख जहीर यांचा सोबत परळी शहरातील अनेक युवकांनी एमआयएम मध्ये प्रवेश केले या वेळी प्रमुख उपस्थिती खासदार इम्तियाज जलील तसेच मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन बीड जिल्हा अध्यक्ष एडवोकेट शफीक भाऊ, नुकतीच एम आय एम मध्ये प्रवेश केलेले परळी शहरातील राष्ट्रवादीचे नगरसेवक शेख शरीफ भाई, अकबर भाई कच्ची, अजीज भाई, राष्ट्रवादी काँग्रेस परळी शहर युवक आघाडीचे उपाध्यक्ष वजीर भाई, परळी शहरातील युवा नेते तोहीद भाई, व इतर उपस्थित होते.