कट्यार ग्रामपंचायत कडे नाली व रस्ते बांधकामा करण्यासाठी पैसे अपुरे

    33

    ?सरपंच भूर ग्रामपंचायत व गावापासून दूर

    ✒️रोशन मदनकर(उप संपादक)मो:-8888628986

    अकोला(दि.20डिसेंबर):- कट्यार ग्रामपंचायत सचिव राजू गरकल यांना 25/11/2020 रोजी तालुका काँग्रेस महासचिव सागर गावंडे यांनी निवेदन दिले असून, गावातील नाली व रस्ते बांधकामसाठी विचारना केली असता 14 वित्त आयोगाचा निधी झाला असून 15 वित्त आयोग वाट पाहावी लागणार असे त्यांचे म्हणणे होते.अजून पण कामाची कोणतीच दाखल घेतली नसून भोंगळ कारभार चालू आहे. व सरपंच भारसाकडे यांनी गावाला विकासापासून वंचित ठेवले आहेतच व स्वतः गावापासून वंचित राहाले आहेत.व गावात न राहता अकोला येथे मुक्काम ठोकले आहे. अकोला तालुका मधील नाव गाजलेली ग्रामपंचायत कट्यार येथील वार्ड क्रमांक 1 मधील दलित वस्ती मध्ये अद्याप नाली व रस्त्याचे बांधकाम अपूर्ण आहे.

    त्यामुळे सदर नागरिकांना नाहक त्रास सहन कराव लागत आहे. ग्रामपंचायत सरपंच देविदास भारसाकडे यांच्या कडे वॉर्ड 1 मधील नागरिकांनी समस्या वारंवार निर्देशनास आणून दिली असून सुद्धा सरपंच देविदास भारसाकडे कोणतीच दाखल घेतली नाही. वार्ड क्रमांक 1 मधील स्वतः सरपंच व उपसरपंच व तीन सदस्य रहिवाशी असून तरी सुद्धा वार्ड नंबर 1 हा विकासा पासून वंचित आहे. दलित वस्ती ला कधी विकासाच वळण कधी येणार व सरपंच गावात कधी येणार यासाठी ग्रामस्थ प्रतीक्षे मध्ये आहेत.