शासकीय कापूस खरेदी केंद्रावरील बेकायदा हमाली वसुलीस सोमवारपासून जिल्ह्यात बंदी

33

🔸शेतकऱ्यांना दिलासा

✒️अनिल साळवे(गंगाखेड प्रतिनिधी)मो:-8698566515

गंगाखेड(दि.20डिसेंबर):-कापसाच्या गाडीचे वजन झाल्यानंतर कापूस खाली करण्याच्या नावाखाली जिनीग मालकाकडून घेण्यात येणाऱ्या बेकायदा हमालीस सोमवारपासून बंदी घालण्यात आली आहे. धनगर साम्राज्य सेनेचे संस्थापक, परभणी लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार सखाराम बोबडे पडेगावकर यांनी केलेल्या (18 डिसेंबर) लेखी तक्रारी नंतर असे आदेश जिल्हा निबंधकांनी सर्व मार्केट कमिटीस दिले .
चालू हंगामात परभणी जिल्ह्यात शासकीय खरेदी केंद्र सुरू झालेल्या दिवसापासून कापसाच्या गाडीचे वजन झाल्यानंतर ती गाडी खाली करण्याच्या नावाखाली जिनिंग चालक मालकाकडून हमाली पोटी 15 रुपये प्रतिक्विंटल प्रमाणे पैसे घेण्यात येत होते.

त्याचबरोबर गाडीचे वजन करण्यासाठी प्रति गाडी 100 रुपये घेण्यात येत आहेत. अशी लेखी तक्रार धनगर साम्राज्य सेनेचे संस्थापक तथा परभणी लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार सखाराम बोबडे पडेगावकऱ्यांनी जिल्हा निबंध सुरवसे यांच्याकडे 18 डिसेंबर शुक्रवारी केली होती. निवेदन देते वेळी जिल्हा निबंधक सुरवसे आणि सखाराम बोबडे यांच्या झालेल्या चर्चेत कापूस खरेदी केंद्रावर होत असलेल्या शेतकऱ्यांच्या लुटी व गैरसोय बद्दल सविस्तर माहिती देण्यात आली. यासंदर्भात सुरवसे यांनी तात्काळ आदेश काढून सोमवारपासून कापसाचे वजन झाल्यानंतर गाडी खाली करण्यासाठी च्या नावाखाली घेण्यात येणारी हमाली बंद करण्याचे आदेश दिले आहेत.

या निर्णयामुळे परभणी जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. शासकीय कापूस खरेदी केंद्राच्या बाहेर यासंदर्भात तसे फलकही लावले जाणार आहेत. यावरूनही जिल्ह्यातील एकदा शासकीय कापूस खरेदी केंद्रावरील जिनिंग चालक-मालक शेतकऱ्याकडून पैशाची मागणी करत असल्यास संबंधित तहसीलदार, जिल्हाधिकारी व जिल्हा निबंधक यांच्याकडे तक्रार नोंदवावी असे आवाहनही त्यांनी केले आहे.