महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघ,नाशिक तर्फे नामदार छगनरावजी भुजबळ यांचे अभिनंदन

    50

    ✒️शांताराम दुनबळे(नाशिक,जिल्हा प्रतिनिधी)मो:-9960227439

    नाशिक(दि.20डिसेंबर):- राज्य शासनाने मागासवर्गीय अधिकारी कर्मचारी यांच्या पदोन्नतीतील आरक्षण संदर्भात मंत्रीमंडळ उपसमिती स्थापन केली आहे. त्या समितीची मुंबई येथे बैठकी संपन्न झाली, सदर बैठकीत दि.२९-९-२०१७ चे शासन आदेश रद्द केला तसेच कर्नाटक राज्याप्रमाणे उच्यास्तरिय समितीची स्थापना करणे ,कवांतिफैबल डाटा (Kwantifaibal Data) तयार करून, आकडेवारी न्यायालयात सादर करणे, आणि न्यायालय प्रक्रियेसाठी निष्णात वकिलांची नेमणूक करणे, इत्यादी ठराव सकारात्मक मंजूर केल्याने उपसमिताचे सदस्य व जिल्ह्याचे पालकमंत्री नाम. छगनरावजी भुजबळ यांचे आज रविवार दि.२०/१२/२०२० रोजी महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघातर्फे पुष्पगुच्छ व शाल देऊन अभिनंदन व आभार व्यक्त करण्यात आले.

    याप्रसंगी नाम. भुजबळ त्यांनी सांगितले की, कवांतिफैबल डाटाची आकडेवारी तयार करणे व या न्यायालयीन प्रक्रियेसाठी निष्णात वकीलाची नेमणूक करणे या सूचना उपसमितीला मी केलेल्या आहेत.या वेळी महासंघाचे मुख्य संघटक एकनाथ मोरे, गोविंदराव कटारे, अरविंद जगताप, रमेश जगताप, उत्तमराव (बाबा) गांगुर्डे, शांताराम साळवे, निलेश पाटोळे, बाळासाहेब शिराळ, दादा अहिरे इत्यादी केंद्रीय,नाशिक विभागीय व जिल्हा पदाधिकारी उपस्थित होते.