आय.टी. आय . प्रवेशाची समुपदेशन फेरीची सूचना

32

✒️रोशन मदनकर(उप संपादक)मो:-8888628986

गडचिरोली(दि.21डिसेंबर):- शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील चौथ्या प्रवेश फेरीच्या समाप्तीनंतर शिल्लक राहिलेल्या जागा जिल्हास्तरीय समुपदेशन फेरीद्वारे भरण्यात येत आहे, त्यानुसार वेळापत्रक आलेले आहे . करीता इच्छूक उमेदवारांसाठी रिक्त जागेचा तपशील २४ डिसेंबरला संकेत स्थळावर उपलब्ध होईल.दि.२५ ते २६ डिसेंबर या दरम्यान जिल्हास्तरीय समुपदेशन फेरीसाठी संस्थानिहाय व व्यवसाय निहाय रिक्त जागाचा अभ्यास करून उमेदवारांनी प्रवेशासाठी आपल्या लाॕगइनवरून समुपदेशन फेरीसाठी नोंदणी करावी. दि.२७ डिसेंबरला ह्या फेरीसाठी जिल्हास्तरीय गुणवत्ता यादी प्रकाशित होईल.

दि.२९ डिसेंबर ते ३१ डिसेंबर पर्यंत या दरम्यान उमेदवारांना दिलेल्या संदेशात नमुद केलेल्या वेळेत समुपदेशन फेरीसाठी करीता मुळ प्रमाणपत्रासह उपस्थित राहावे आणि उमेदवारांनी समुपदेशन फेरीचा लाभ घ्यावा , असे प्राचार्य संतोष साळुंके यांनी कळविले आहे. तसेच काही शंका किंवा अडचण असल्यास प्रवेश प्रमुख श्री. मधूपवार किंवा श्री. नितिन श्रीगिरीवार यांचेशी संपर्क साधावा, असे कळविण्यात आले आहे