सर्वच इच्छुक बनले भावी सरपंच

30

🔹आरक्षण रद्द झाल्याने उघडली संधीची दारे

✒️अशोक हाके(बिलोली,तालुका प्रतिनिधी)मो:-9970631332

बिलोली(दि?21डिसेंबर):-.निवडणूकीनंतर सरपंच पदाचे आरक्षण जाहीर होणार असल्याने आता या निवडणुकीत वेगळाच रंग आला आहे.आरक्षण रद्द झाल्याने अनेकांसाठी संधीची दारे उघडली आहेत.परिणामी आता सर्वच इच्छुक भावी सरपंच बनले आहेत.शिवाय निवडणुकीत होणारा घोडेबाजार थांबून सर्वसामान्य उमेदवारांना न्याय मिळणार आहे,तर विरोधकांशी आतून हातमिळवणी करून मतदारांना वेठीस धरणा-यांचे मात्र चांगलेच धाबे दणाणले आहे.ग्रामपंचायत निवडणुकीनंतर सरपंच पदाची आरक्षण सोडत होणार असल्याने आता सगळेच इच्छुक उमेदवार मोर्चे बांधणीला लागले आहेत.

आतापर्यंत निवडणुकीपूर्वी सरपंचपद आरक्षित होत असल्याने संबंधित प्रवर्गातील उमेदवार देण्याची व्यवस्थाकेली जात होती.आता तसे होणार नसल्यानेगावातील पुढा-यांच्या मनमानीला चांगलाच चाप बसणार आहे.तसेच सरपंचपद महिला राखीव असेल तर गावातील बलाढ्य पुढा-याच्या कुटुंबातील महिलेला निवडणुकीत उभे करून निवडून आणले जात असे.त्यामुळे अशाच कुटुंबातीलमहिला सरपंच होणार हे ठरलेले असायचे.गावातील बलाढ्य पुढा-याच्या घरातील किंवा त्याच्या प्रभावाने काम करणारा सरपंचपदाचा उमेदवार ठरवला जाण्याचे जवळजवळ ठरलेलेच असायचे.

साहजिकच अनेकदा एकाच घरातील सदस्य सरपंच,ग्रामपंचायत सदस्य ठरलेलेच.इतकेच नाही तर ग्रामपंचायतीचे सदस्यही पंधरा ते वीस वर्षे सारखेच राहत असत.आता नवीन निर्णयामुळे या गोष्टीवर आपोआपच नियत्रंण येणार असल्याने तसेच ख-या आरक्षित माणसाला न्याय मिळणार असल्याने मतदारांत नवचैतन्य पसरले आहे.ग्रामविकास मंत्र्यांनी घेतलेल्या या निर्णयाचे ग्रामीण भागात जोरदार स्वागत करण्यात येत आहे.