“जय जवान-जय किसान” नारा लावत कारसपल्ली येथे चक्काजाम आंदोलन

38

✒️विजय तोकला(विशेष प्रतिनिधी)मो:-9403477377

सिरोंचा(दि.21डिसेंबर):- तालुक्यातील शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शेतकरी चक्काजाम आंदोलनात तालुक्यातील अनेक महिलांनी व शेतमजूरानी तसेच शेतकरी संघटनेनी सहभागी दर्शवून शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आंदोलनात बसले आहेत.राज्य शासनाने जो जी.आर काढलेला आहे तो जी.आर रद्द करून नवीन जी.आर अमलात आणावा अशी मागणी शेतकऱ्यांन कडून दिसत आहे.

याच वेळी तालुक्यातील संबंधित अधिकाऱ्यांनी आंदोलन कर्ते यांच्याशी चर्चा करून आपल्या प्रस्ताव जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठविण्यात येईल.आपल्या मागण्या लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी राज्य शासनाकडे पाठपुरावा केल्या जाईल.शेतकऱ्यांचे मागणी हेच आहे की,जर शासनाने दोन तीन दिवसात निर्णय घेतला नाही तर तहसील कार्यालया व जिल्हा कार्यालय समोर ठिया आंदोलन करतच राहनारच असे शेतकरी म्हणाले.यावेळी तालुक्यातील शेतकरी व कारसपल्ली येथील शेकडो शेतकरी सहभागी झाले होते.