श्रीमती.वैशाली बापुराव चव्हाण यांना राज्य स्तरीय कर्तृत्ववान महीला नारीरत्न पुरस्कार 2020 देऊन गौरविण्यात आले

38

✒️संजय कोळी(दोंडाईचा प्रतिनिधी)मो:-9075716526

दोंडाईचा(दि.22डिसेंबर):-आस्था अनघादि फौंउडेशन महाराष्ट्र राज्य, च्या संस्थापिका अध्यक्षा वैशालीताई चव्हाण यांचा ,ज्ञान संकल्प सामाजिक संस्था दौंड, महाराष्ट्र संस्थे तर्फे राज्यस्तरीय कर्तृत्ववान नारीरत्न पुरस्कार ने सन्मान केला गेला.कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.आमदार श्री. राहुल दादा कुल (दौंड विधानसभा) ,मा.आ. श्री.रमेश आप्पा थोरात चे.पुणे जिल्हा म स.बँक,मा आप्पा साहेब पवार (रा. का) ,मा. सोहेल खान अल्पसंख्याक.का.कमिटी ,मा. सचिन कुलथे मनसे,मा. पो.उप नि.सचिन पालवे ,आदी मान्यवर उपस्थित होते.

वैशालीताई चव्हाण या शिंदखेडा तहसीलदार श्री.सुनिलजी सौंदाणे यांच्या धर्मपत्नी आहै. गेल्या अनेक वर्षा पासुन त्या सामजिक क्षेत्रांत काम करत आहे. संस्थे मार्फत विविध समाज उपयोगी उपक्रम राबवत असतात. पुढिल आठवड्यात “एक स्वेटर उबदार”हा उपक्रम घेऊन गरजु लोकांना स्वेटर, ब्लँकेट, चादरी वाटप करणार आहे.अशाच नवनवीन उपक्रमांची दखल घेत वरील पुरस्काराने वैशाली ताई यांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. मागिल महिन्यात फिल्म सोसायटी तिल प्रतिष्ठित मानला जाणारा दादा साहेब फाळके कोरोना योध्दा 2020 देऊन सन्मानित केले.या

चे श्रेय त्या संस्थेचे पदाधिकारी, तसेच आईवडील, बंधु यांचे आशीर्वाद व पती श्री.सुनिल जी सौंदाणे यांचे मार्गदर्शन यांना देतात . या बद्दल सर्व स्तरातुन वैशाली ताई चव्हाण-सौंदाणे यांचे वर कौतुक व शुभेच्छांचा वर्षाव होत आहै. या साठी त्या ज्ञान संकल्प संस्थेचे अध्यक्ष मा. सदाशिव रणदिवे, मा. सुभाष भोसले, सौ.वैशाली रणदिवे,प्रा.दिनेश पवार आदी पदाधिकारी यांचे आभार व्यक्त करत आहे.