धुळ्याच्या सौ कविता ताई कोळी यांचा दौंड, जिल्हा पुणे येथे कुशल नेतृत्व जननायक लोकगौरव पुरस्काराने सन्मान

27

✒️संजय कोळी(दोंडाईचा प्रतिनिधी)मो:-9075716526

धुळे(दि.22डिसेंबर):- येथील समाज सेवीका ,आदिवासी वाल्मिकलव्य सेना प्रदेश अध्यक्षा, पैलवान गृप कुस्ती प्रेमी महाराष्ट्र राज्य महिला संपर्क प्रमुख ,दादा साहेब फाळके आयकॉन अवॉर्ड फिल्म इंडस्ट्रीज कंपनी मेंबर्स ..यांना दौंड जि पुणे येथे कुशल नेतृत्व जननायक लोकगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले ज्ञानसंकल्प सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्य चे संस्थापक अध्यक्ष मा सदाशिव रणदिवे, प्रदेश उपाध्यक्ष मा सुभाष भोसले सर यांच्या द्वारे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

दि २० डिसेंबर रोजी दौंड येथील अष्टविनायक सभागृह येथे करण्यात आले होते.पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन मा आमदार रमेश आप्पा थोरात, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे दौंड तालुका अध्यक्ष आप्पासाहेब पवार, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अल्पसंख्याक सेल पुणे जिल्हा अध्यक्ष सोहेल भाई खान ,महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुका अध्यक्ष सचिन कुलथे, पोलिस उपनिरीक्षक सचिन पाकले साहेब यांच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडला तसेच सदरील पुरस्कार हा महाराष्ट्रातील ५१ उत्कृष्ट सामाजसेवकांना मिळाला आहे.त्यात आपल्या धुळ्याच्या सौ कविता ताई कोळी यांना कुशल नेतृत्व जननायक लोकगौरव पुरस्कार देवुन सन्मानीत करण्यात आले.

कोवीड-१९ लॉक डाऊनमध्ये केलेल्या कामाचा व शैक्षणिक, सामाजिक कार्याचा हा सन्मान आहे.कविता कोळी ह्या धुळे येथील सामाजिक, राजकीय कार्य करणारे स्वर्गवासी नाना कोळी यांच्या सुकन्या आहेत. कविता कोळी शिक्षिका असुन नेहमीच सामाजिक कार्य मधे अग्रेसर असतात… लॉक डाऊन दरम्यान अनेक गरजु लोकांना किराणा किट वाटप केले व सहकार्य केले… सौ कविता ताई कोळी यांनी आपल्या सामाजिक कार्याचा अल्पावधीतच लक्षवेधी ठसा उमटवीला आहे.व त्या नेहमिच समाजातील पिडीत व वंचीत घटकांसाठी धावून जात असतात.सौ कविता कोळी यांना मिळालेल्या पुरस्काराने त्यांच्यावर समाजातील विवीध स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.