गेवराई, बीड, माजलगाव, हद्दीतील वाळू चोरीला केल्याप्रकरणी चौकशी करा – प्रदेश सरचिटणीस सुनील ठोसर पाटिल

29

✒️नवनाथ आडे(गेवराई प्रतिनिधी):-9075913114/9404223100

गेवराई(दि.22डिसेंबर):- तालुक्यातील कोपरा येथील जप्त वाळू साठ्याचा गुत्तेदाराला वाळू साठा दिलेला आदेश रद्द करावा. जप्त केलेल्या साठ्याजवळ सिंदफणा नदीपात्रात दि, १९ डिसेंबर पासून बेमुदत उपोषण सुरु आहे. कोपरा येथे महसूल विभागाने वाळू साठा जप्त केला होता.

त्यामधील काही वाळू चोरीला गेली असा अहवाल आपल्या विभागाच्या अधिकारी यांनी दिला व या तीनही हद्दीतील उत्खनन करण्यात यावा दत्ता जाधव यांच्या उपोषणाची दखल घेऊन सर्व वाळू साठ्याचा जाहीर लिलाव करण्यात यावा व दोषी महसूल कर्मचारी यांचे पगारीतुन वसुली करण्यात यावी.

सिंदफणा नदीची अवैध वाळू उपशामुळे शेतकरी बांधवांना शेतीसाठी पाणी अपुरे पडत असल्यामुळे अतोनात नुकसान थांबवावे वाळू माफिया व महसूल प्रशासनाची दादागिरी शेतकरी भयभीत असून शेतकरी यांना पाणी व शासनास महसूल साठी मदत होईल अन्यथा गेवराई, बीड, माजलगाव, तहसील कार्यालय समोर लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येईल असे देखील रयत शेतकरी संघटनेचे प्रदेश सरचिटणीस यांनी सांगितले आहे.