निमगाव प्राथमिक आरोग्य केंद्र उभारणी संदर्भात बेजबाबदार पत्रव्यवहार करणारे अवर सचिव यांचेवर कारवाई करा – प्रमोद खंडागळे

25

✒️बुलढाणा(पुरोगामी संदेश नेटवर्क)

बुलडाणा(दि.22डिसेंबर):- निमगाव प्राथमिक आरोग्य केंद्र उभारणीबाबत उच्च प्रशासकीय अधिकारी माननीय प्रधानमंत्री कार्यालयाकडून प्राप्त आदेशालाही न जुमानता केवळ बेजाबादारपणे पत्र व्यवहार करून जनतेची दिशाभूल केल्याप्रकरणी मा. प्रधानमंत्री व मा.मुख्यमंत्री यांनाच तक्रार करून कारवाईची मागणी केली आहे. 

     निमगाव ता. नांदुरा जि. बुलडाणा येथे प्राथमिक आरोग्य केंद्र उभारणीत लोकप्रतिनिधी व यंत्रणेकडून होत असलेल्या  दिरांगीबाबत प्रमोद खंडागळे (बुलडाणा जिल्हाध्यक्ष महाराष्ट्र विज ग्राहक संघटना) निमगाव यांनी  मा .पंतप्रधान कार्यालयाकडे दि ०६/०९/२०१९ रोजी न्यायार्थ निवेदन सादर केले होते. त्यावर पीएमओ कार्यालयाकडून पत्र. क्र. No:PMOPG/D/2019/0345685 नुसार दि.१८/०९/२०१९ रोजी मुख्य सचिव महाराष्ट्र शासन यांना योग्य ती कार्यवाही करून  निवेदनकर्त्यास कळविण्याबाबत निर्देश दिले होते.

मात्र जवळपास एक वर्ष उलटून गेल्यानंतरही त्याबाबत काहोही कळविण्यात न आल्याने खंडागळे यांनी माहिती अधिकारांतर्गत दि.२६/११/२०२० रोजीच्या अर्जाद्वारे मुख्य सचिव महाराष्ट्र शासन मंत्रालय मुंबई यांचेकडे झालेल्या कार्यवाहीबाबत माहिती मागविली होती. मुख्य सचिव यांच्या कार्यालयातील संबंधित माहिती अधिकारी यांनी सदर प्रक्रिया हि सामान्य प्रशासन विभागाशी संबंधित असल्याने त्या विभागाच्या जन माहिती अधिकारी कार्यासन-२९-अ, सामान्य प्रशासन विभाग, मंत्रालय मुंबई -३२  यांचेकडे पत्र क्र. मुसका २०२०/४५१७२९९/का.१ दि.०३/१२/२०२० नुसार वर्ग केले होते.

मात्र सदर सामान्य प्रशासन विभागाचे सं .कृ भोसले जन माहिती अधिकारी तथा अवर सचिव यांनी प्रकरणाचे गांभीर्य लक्षात न घेता तसेच सदर प्रकरण मा. पंतप्रधान कार्यालयाशीच संबंधित आहे याकडेही जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून अत्यंत बेजबाबदारपणे सार्वजनिक आरोग्य विभागाकडे पाठविण्य ऐवजी, प्रकरणाचा काहीही संबंध नसलेल्या महाराष्ट्र शासनाच्या उद्योग , उर्जा व कामगार विभागाकडे आवश्यक त्या कार्यवाहीसाठी पाठविल्याचे त्यांचे पत्र क्र. माअअ -२०२०/प्र.क्र.११६/ई/-४५१७२९९ /कार्या -२९-अ दि. १४/१२/२०२० नुसार पाठविले आहे.

त्यामुळे मा. प्रधानमंत्री कार्यालायाच्या पत्र व्यवहारास सुद्धा हे उच्च पदस्थ अधिकारी अजिबात गंभीरतेने घेत नाहीत मग सर्व सामन्यांच्या समस्यांचा तर देवच वाली आहे अशी परिस्थिती निर्माण केल्या जात आहे. त्यामुळे ह्यां भोसले अवर सचिव सामान्य प्रशासन विभाग मंत्रालय मुंबई यांचेवर जनहितार्थ कठोर कारवाई करावी अशी मागणी महाराष्ट्र विज ग्राहक संघटनेचे बुलडाणा जिल्हाध्यक्ष प्रमोद खंडागळे यांनी मा.पंतप्रधान नवी दिल्ली  व मा. मुख्यमंत्री महाराष्ट्र शासन मुंबई यांचेकडे आज दि.२२/१२/२०२० रोजी मेलद्वारे निवेदन सादर करून केली आहे..