८ पिस्तूल घेऊन जाणाऱ्या पंजाब राज्यातील ३ संशयितांना पकडले

103

✒️संजय कोळी(दोंडाईचा प्रतिनिधी)मो:-9075716526

शिरपूर(दि.23डिसेंबर):– पंजाब येथील ३ संशयितांना मध्यप्रदेश महाराष्ट्र सिमेभागालगत ८ पिस्तूल, ६ जिवंत काडतूसे, १५ हजार रोख रक्कमसह ५ लाख २० हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला़ या तिनही संशयितांना अटक करण्यात आली़ ही कारवाई सांगवी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील यांनी त्यांच्या पथकासह मंगळवारी पहाटे साडेतीन वाजेच्या सुमारास केली़.

पंजाब राज्यातून काही संशयित हे अग्नीशस्त्र खरेदी करण्याच्या इराद्याने महाराष्ट्र व मध्यप्रदेशच्या सिमेलगतच्या भागात आल्याची माहिती सांगवी पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील यांना प्राप्त झाली होती. लागलीच पथकातील नरेंद्र खैरनार, राजू सोनवणे, चत्तरसिंग खसावद, संजीव जाधव, पवन गवळी, इसरार फारुकी, संभाजी वळवी यांच्या पथकाने पहाटे ३ ते साडेतीन वाजेच्या सुमारास शोध घेण्यास सुरवात केली.