मनुस्मृती जाळली, तेव्हा माणुसकी कळली

33

जगातील सर्वात विद्वान आणि जगातील सर्वात मोठे वैयक्तिक वाचालयाची जागतिक नोंद ज्या माणसाकडे आहे असे महा मानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. याच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बद्दल बोलायचे झाले तर विद्यार्थी दशेत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर क्लास मध्ये बसलेले असताना प्राध्यापकांना प्रश्न पडायचा आपण काय शिकवावे आणि कोणकोणते संदर्भ ग्रंथ चाळावे जेव्हा बाबासाहेब आंबेडकर वकिली करायचे तेव्हा न्यायधिश त्यांचे वादविवाद ऐकण्यासाठी बसायचे आणि जेव्हा घटना लिहण्याची वेळ आली तेव्हा घटना समितीची संपुर्ण बाजु स्वतः सांभाळून समस्त भारत देशाला एकसंघ बांधुन ठेवले तेच राष्ट्रपुरुष डॉ. बाबासाहेब आंबेडकर होत. जे स्वत: दहा बाय दहाच्या रुम मध्ये राहिले पण पुस्तकासाठी तिन मजली घर बांधले, एवढे मोठे ज्ञानाचाचे महासागर, पुस्तकाला जिवापेक्षा जास्त जपणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी एक पुस्तक जाळावे म्हणजे ते पुस्तक किती विकृत होते याची प्रचिती येते.

जहाजामधून काही पुस्तके पाण्यात पडले तर माझ्या शरीरातील रक्ताचे थेंब पाण्यात पडले एवढा पुस्तकाला जिव लावणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मनुस्मृती नावाचे पुस्तक जाळतात याचाच अर्थ मनुस्मृती हे पुस्तके मानव हिताचे नव्हते. मनुस्मृती डॉक्टर बाबासाहेब यांनी का जाळली? पुस्तकासाठी घर बांधणारा महामानव एक पुस्तक का जाळत असेल? या प्रश्नांची उत्तरे शोधली तर आपल्या लक्षात येते मनुस्मृती हि चातुवर्ण व्यवस्थेची माता आहे. मनुस्मृती चातुवर्ण व्यवस्था टिकवून ठेवण्याचे सर्व उपाय सांगते. मानसाचे माणूस पण काढून घेऊन माणवाला गुलाम म्हणून जिवन जगायला भाग पाडते. मानसिक गुलामीच्या माध्यमातून एकाच वर्णाचे वर्चस्व कायम रहाण्यासाठी दिशादर्शक ठरते. मनुस्मृती च्या लिखाणाचा आणि विज्ञान, तर्क व मानुसकी यांचा दूरवर कुठेच संबध नाही. याच मनुस्मृती ने ब्रम्ह देवाला बाळांतीन केले, आता आपण ब्रम्हदेवाचेचे अस्तित्व मान्य केलेच तर ब्रम्हांची गर्भधारणा अनैसर्गिकच आहे. कारण विज्ञाना नुसार कोणताही नर जिवाला जन्म देत नाही.

बरं मनुस्मृती ने ब्रम्हदेवाला बाळांतीन केलेच पण एकाच ठिकाणाहून नाही तर चार चार ठिकाणाहून केले. हे जगात कुठेच शक्य नाही ते मनुस्मृती ने शक्य करून दाखवले. एका नराचे बाळांतपण आणि चार जागेवरून. किती आश्चर्य! दुसरी गोष्ट चार ठिकाणाहून बाळांतीन केल्यानंतर येथे विषमतावादी जे वर्ण निर्माण केले त्या वर्णाचे जनक ब्रम्हदेवाला बनवले. ब्राह्मण सर्वश्रेष्ठ आहे. नंतर क्षत्रिय नंतर वैश्य आणि सर्वात शेवटी शुद्र असे चार वर्ण. हि वर्णाची उतरंड. कोणी मुखातून, कोणी काखेतून कोणी कुठुन आणि शुद्र पायातुन आले म्हणून शुद्रांनी फक्त वरील तिन वर्णाची सेवा करायची. चारही वर्णाला लॉक लागलेले होते. चारही वर्णाचे कामे वाटून दिलेली होती. ब्राह्मण सर्व श्रेष्ठच होता. ब्राम्हणाला शिक्षण घेण्याचा, संपती जमवण्याचा आणि राज्य करण्याचा अधिकार होता. खालच्या वर्णातील कितीही विद्वान असलेला माणूस दुसऱ्या वर्णात जाऊ शकत नव्हता. एलढी विषमतावादी व्यवस्था मनुस्मृतीने ब्रम्हदेव बाळांतीन करून केला.

मनुस्मृती ने विशेष अधिकार ब्राह्मण वर्णासाठी राखीव ठेवले होते. जसे ब्राह्मण हा कितीही व्यभिचारी, कपटी असला तरी तो सर्वश्रेष्ठ असतो. त्याची सेवा इतर वर्णांनी करावी. आता काही लोक खुप बुद्धीवान आहेत ते म्हणतात आज तसे ब्राह्मण आणि त्या विचाराचे ब्राह्मण राहीले नाही. पण हेच बुद्धिमान लोक हे सांगत नाहीत आजही ब्राह्मण व्यक्ती मनुस्मृती ला विरोध करत नाही अथवा मनुस्मृती चे पालन करतो. हे सत्य सांगण्याची कोणाची हिंमत होत नाही. महिला आणि शुद्र यांना तर जनावरापेक्षा हिन वागणूक व महत्त्व होते.

ढोर, गवार, शुद्र, नारी
सब है ताडना के अधिकारी

यावरून शुद्रांना आणि महिलांना काय महत्त्व मनुस्मृती ने दिले असेल. नारी उपभोगाच साधन म्हणून तिने चुल आणि मुल सांभाळावे. कोणत्याही ब्राम्हणास कोणतीही स्त्रि आवडल्यास उपभोग घ्यावा, शुद्रांनी ब्राम्हणाला सल्ले देऊ नये. शुद्रांच्या उपस्थितीमध्ये कोणतेही वेद वाचु नाही. स्त्रियांना आणि शुद्रांना शिक्षणाचा कोणताही अधिकार नाही. अशा प्रकारे ब्राम्हण श्रेष्ठ व्यवस्था मनुस्मृती ने निर्माण करून दिली होती. शुद्र व स्त्रिया यांना संपती बाळगण्याचा अधिकार नाही, बोलण्याचा अधिकार नाही. शुद्रांनी कमावलेली संपती ब्राम्हणांना द्यावी म्हणजे पुण्य लागते. एखाद्या शुद्राने त्याच्या जवळ असलेली संपती दान जरी केली नाही तरी त्यावर ब्राम्हणांचा अधिकार राहील. महिलांनी घराबाहेर पडू नाही, मानसमोर उभे राहु नये, तिने शिक्षण घेऊ नये. लग्नात बापाने मुलीला दान करावे, कोणत्याही संपतीवर मुलीचा हक्क राहणार नाही. अशा प्रकारे महिलांना मानसिक तसेच शारिरीक गुलामगिरी मध्ये ठेवून प्रवाहापासून खुप दुर ठेवल्या गेले.

महिलांच्या मासिक पाळीला अपशकुन, पाप, अपवित्र मानून स्त्रिचा अवमान करून स्त्रियांची माणसिक गुलामी परिपक्व केली जात असे. स्त्रियांना आणि शुद्रांना नविन कपडे घालण्याचा वा चांगले जेवन जगण्याचा सुद्धा अधिकार नव्हता. जुने फाटलेले कपडे शुद्र व स्त्रियांना घालवण्यासाठी ब्राम्हणाच्या नोकराने द्यावे. उष्ठे अन्न खायला देणे. अशी लाजीरवाणी व्यवस्था मनुस्मृती ने निर्माण केली होती. मानसाला माणूस म्हणून स्थान नव्हते, स्त्रियांना कोणताही मान नव्हता अशी विषमतावादी मनुस्मृती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जाळून टाकली आणि खऱ्या अर्थाने येथे सामाजिक क्रांतीची ठिणगी पेटून आत्मसन्मान व स्वाभिमानाची जाणीव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुळे झाली.

ज्या मनुस्मृती च्या जोरावर येथे चातुवर्ण व नंतर त्याचे जातीत रुपांतर झाले आणि विषमतावादी व्यवस्था व्यवस्था निर्माण होऊन धर्मसत्ता, राजसत्ता, अर्थसत्ता सर्व एकाच वर्णाच्या हाती देण्याचे काम केले. शुद्रांनी आणि स्रित्रांनी संपती जमवणे, शिक्षण घेणे, चांगले कपडे घालणे यावर बंदीच नव्हती तर याला पाप समजल्या जात होते. नव्वद वर्षाचा म्हातारा चौदा वर्षाच्या मुलीसोबत विवाह करण्याची परवानगी मनुस्मृती ने दिली होती. ब्राम्हणांना ज्या स्त्रिया आवडतील त्यांच्या सोबत संबध ठेवता येईल, त्या संबधातून तयार झालेल्या मुलाला कोणताही वारसा मिळणार नाही. लहान मुले, स्त्रिया, म्हातारे, पागल व शुद्रांना बांधून ठेवावे. अशी मानूसकिला काळीमा फासणारी शिकवण मनुस्मृती देत होती. विषमतावादी व्यवस्था निर्माण करण्याची गुरुकिल्ली ही मनुस्मृती होती. ब्राह्मण आणि ब्राम्हणांच्या नियमाविरोधात कोणाला बोलण्याची मुभा नव्हती तरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी ज्यांच्या कडे नैतिकता मानुसकी आणि दूसऱ्याला सन्मान देऊन माणुस समजण्याची क्षमता नाही तीच म्हनुस्मृती फाडून ही विषमतावादी व्यवस्था आम्हाला मान्य नाही.

आम्ही ही मानव आहोत आम्हाला सुद्धा जगण्याचा, शिक्षणाचा, संपती गोळा करण्याचा अधीकार आहे या पुढे देशात विषमतावादी मनुस्मृती चे नाही तर समतावादी विचाराचे मानसाला माणुस समजणाऱ्या विचारांचे पालन होईल अशा प्रकारे संदेश देऊन, भारतातील माणसिक गुलाम लोकांच्या जिवनात व महिलांच्या जिवनात खुप मोठा परिवर्तनाचा प्रकाशमय सुर्य येऊन जिवनात माणुसकी, सन्मान, व अधिकार भरायला सुरवात झाली. स्त्रियांना समान स्थान, पगार, शिक्षण मिळावे म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सुरवाती पासुन आग्रह ही होते. स्त्रियांना कल्पना शक्तीच्या पलिकडे असलेल्या गुलमागिरी आणि विषमेतेत खितपत पडलेल्या अवस्थेतून भरजरी साडीत, पाच मजली माडीत आणि महागड्या गाडीत आणण्यासाठी स्वतः च्या बायको कडे दुर्लक्ष केले. परंतु याच मनुस्मृती दहण दिनांचे महत्त्व आणि गांभीर्य कित्येक महिलांना कळतच नाही, कारण सगळं काही फुकटात मिळाले, जिवन, कुटुंब, पैसा , मानसिक त्रास, व्यलस्थेचा विरोध याला फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामोरे गेले आणि येथील समाजाला समता व सन्मान मिळवून दिला.

बुरसटलेले विचार, परंपरा, रूढी आणि बुरसटलेले संस्कार २५ डिसेंबर रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जाळून नवक्रांतीची ज्योत पेटवली तोच खरा दिवस आमच्या साठी आमच्या स्वातंत्र्याचा, सन्मानाचा आणि प्रवाहात येण्याचा होय. जे लोक मनुस्मृती ने गुलाम बनवून ठेवले त्याच लोकांना आपण गुलाम होतो याची जाणीव नाही म्हणून आजही ते गुलामीच करतात. अंगावर चांगले कपडे, गाडी, पैसा, शिक्षण हि देण प्रत्येक भारतीयांसाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुळे आहे. बुरसटलेले विचार, जातीय विषमता, महिलांना मंदिर प्रवेश बंदी, मासिकपाळी विटाळ, पुरुषाअगोदर न जेवने, पुरुषांबरोबर समाजात मान न मिळने हे सर्व म्हणुस्मृतीची देन आहे.

आज थोडेफार शिकलेले आणि राजकारणाच्या लालसेने समाजात कामाचा देखावा करणारे खुप स्वंय घोषीत नेते आहेत, तेही मनुस्मृती दहन दिवस साजरा करतात, आणि असे बोलताना कि मनुस्मृती दिवस साजरा करताना, मनुस्मृती वर बोलल्या नंतर जसे काय कोणावर उपकारच केले. कारण बोलणाऱ्याला हे माहिती नसते आपणच शुद्र आहोत. आज शुद्र म्हणजे आपण पुर्वाश्रमीचे अस्पृश्य असे समजतो. म्हणजे ज्यांना स्पर्श करणे पाप समजले जायचे. मुळात पुर्वाश्रमीचे जे अस्पृश्य लोक होते त्यांची दखल मशनुस्मृतीने देखील घेतली नाही कारण या अस्पृश्य समुहाला महात्मा फुले अतिशूद्र म्हणातात. जर अस्पृश्य समुह हा अतिशुद्रात येतो तर मग नेमके शुद्र म्हणजे कोण असा प्रश्न मनुस्मृती दिनाच्या निमीत्तानेही कोणत्याही शुद्रास पडत नाही, आणि शुद्राला आपण शुद्र आहोत म्हणून याची जाणीव नाही म्हणून काही शुद्र तर स्वतः ला क्षत्रिय समजतात. आणि परशुरामाने तेवीस वेळा पृथ्वी निक्षत्रिय केलेली आहे मग क्षत्रिय राहीले कसे. ज्या शुद्रांसाठी मनुस्मृती जाळली ते शुद्र आजही झोपलेले आहेत, आणि फक्त अतिशुद्र मनुस्मृती दहन दिवस साजरा करून मानसिक स्वांतत्र्य साजरे करत असतात.
*************************************
✒️लेखक:-विनोद पंजाबराव सदावर्ते
रा. आरेगाव ता मेहकर
मोबा: ९१३०९७९३००
*************************************