आखाड्यावर दरोडा एक लाखाचा मुद्देमाल घेऊन दरोडेखोर पसार

34

✒️अनिल साळवे(गंगाखेड प्रतिनिधी)मो:-8698566515

गंगाखेड(दि.23डिसेंबर):- तालुक्यातील राणीसावरगाव पासून दोन किलोमीटर अंतरावर परभणी लातूर रोड जवळील बालाजी सेल्स ईस्सार पेट्रोल पंप शेजारी मारोती आडे व जालिंदर आडे रा. घाटेवाडी या शिल्पकार बंधूच्या आखाड्यावर दि २१ डिसेंबरच्या पहाटे आठ ते दहा जणांनी मिळून आकड्यावर दरोडा टाकला.

आखाड्यांवरील दोन महिला व एक पुरुष यांना मारहाण करून जखमी करत १ लाख ३० हजार ५०० रुपयाच्या रोख रक्कम सह मुद्देमाल घेऊन पसार झाले आहेत. जखमीमध्ये अनुसयाबाई दतराव आडे वय ६५ वर्ष, केराबाई प्रकाश राठोड वय ५५ वर्ष ,सालगडी संजय पाटील ६० वर्ष यांना मारहाण करून जखमी केले.

रोख रक्कम ,सोन्याची दागिने झुंबर २०,०००,बोरमाळ ५२,०००,सोन्याची नथ ६,०००,चांदीचे कडे २०,०००रू,चांदीच्या कोपर्‍या१५,०००रू, चांदीची पाटली १०,०००रू, चांदीची पायाची चैन १५, ००रू, असा एकूण अंदाजे एक १ लाख ३०,हजार ५०० रुपयांचा ऐवज दरोडेखोरांनी लुटून नेला आहे. सकाळी नातेवाईक आखाड्यावर आल्याने ही घटना उघडकीस आली आहे.

प्राथमिक आरोग्य केंद्र राणीसावरगाव येथे जखमीला प्रथमोपचार करून पुढील उपचारासाठी नांदेड येथे हालविण्यात आल्याची माहीती मीळाली आहे. या दरोड्यामुळे आसपास परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.पिंपळदरी पोलीस ठाण्यात गुन्हा १७२/२०,२० क, ३९७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास ए. पी. आय पुजारी, व पोलिस कर्मचारी करत आहेत.