मनसे शाखा प्रमुख भटु माळी यांची कार्यकर्त्यांसह लोक क्रांती सेनेत प्रवेश

34

✒️संजय कोळी(दोंडाईचा प्रतिनिधी)मो:-9075716526

नेर(दि.23डिसेंबर):-नेर येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेर शाखाप्रमुख भटू माळी यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांसह लोक क्रांती सेनेचे संस्थापक अध्यक्ष देवेंद्र पाटील, उपनेते, बी. एन. बिरारी,धुळे तालुका अध्यक्ष दत्तू माळी यांच्या प्रमुख उपस्थितीत लो क्रांती सेनेत प्रवेश केला.

लोक क्रांती सेना नेर शाखेच्या वतीने घेण्यात आलेल्या या प्रवेश सोहळ्याला लो क्रांती सेनेचे संस्थापक अध्यक्ष देवेंद्र पाटील उपनेते बी.एन.बिरारी, वाहतूक सेनेचे अध्यक्ष देवेंद्र अहिरे, लोक क्रांती युवा सेनेचे धुळे जिल्हा अध्यक्ष पवन देवरे, लोक क्रांती युवा सेनेचे धुळे जिल्हा कार्याध्यक्ष वाल्हे तालुका अध्यक्ष दत्तू माळी यांच्यासह लोक क्रांती सेनेचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

मान्यवरांच्या हस्ते लोक क्रांती सेनेचे सभासदत्वाचे पत्र देऊन त्यांना अधिकृत प्रवेश देण्यात आला.,या प्रवेश सोहळ्याच्या कार्यक्रमात धुळे तालुका अध्यक्ष म्हणून तू माळी यांची फेरनिवड करून उपस्थित मान्यवरांच्या हस्ते त्यांना धुळे तालुका अध्यक्ष पदाचे नियुक्ती पत्र देण्यात आले.

नेर जिल्हा परिषद गट प्रमुख म्हणून भटू माळी तर मिरज चे अध्यक्ष म्हणून हौशीलाल सैंदाणे यांची निवड जाहीर करून त्यांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले. कार्यक्रमाला रवी वाघ, विजय वाघ,मधुकर माळी,चिराग उद्दीन शेख,रुबाब शेख,संतोष टेलर,शशिकांत गवळी,सोनू माळी मनोज बोरसे,विक्की बोरसे,बापू खलाणे,जगदीश सैंदाणे, तुषार सैंदाणे, भूषण माळी,राहुल माळी आधी क्रांती सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.