दिव्यांग शेतकरी एक वर्षांपासून बघतोय मदतीची वाट

33

✒️प्रदिप रघुते(विशेष प्रतिनिधी)मो:-9049587193

नांदगाव खंडेश्वर(दि.23डिसेंबर):-तालुक्याती कोव्हला जठेश्वर येथिल दिव्यांग गिरीश पंत यांचेकडे कुटुंबाचा उदर्निर्वाह होण्या इतकी जमिन आहे, त्यात अतिदुष्टीने त्याच्या शेतात असलेली 40 फुट खोल विहीर पुर्णात खचुन मोटर पंप सुद्धा मातीमोल झाले.असे असतांना त्यांनी शासकीय मदतची मागणी तहसिल, जिल्हा अधिकारी यांचे कडे केली.

त्यावर तलाठी, कुषीविभाग यांनी पहाणी करुण पचंनामा सुद्धा पाठवला आहे. मात्र 1 वर्षाचा कालावधी होऊन सुद्धा त्यांना मदत मिळाली नाही.

वारंवार पाठपुरावा व मागणी करून सुध्दा आश्वासनाशिवाय काहीही मिळाले नाही. शेवटी नुकसान भरपाईची मदत न दिल्यास गिरीष ने आपल्या परिवारासह उपोषणाचा इशारा अपंग जनता दल सामाजिक संघटणा यांच्या वतीने दिला आहे.निवेदन देताना तालुका अध्यक्ष प्रदिप रघुते, मयूर मेश्राम, रामेश्वर, राठोडसह कार्यकर्ते हजर होते