इच्छुक उमेदवारांकडून स्वयंघोषणापत्र घेण्याची ग्रामसेवक युनियनची मागणी

25

✒️चिमुर(पुरोगामी संदेश नेटवर्क)

चिमूर(दि.24डिसेंबर):-जिल्ह्यात होऊ घातलेल्या ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकीसाठी येणे बाकी प्रमाणपत्र व्यतिरिक्त इतर कोणतेही प्रमाणपत्र देण्याची सक्ती करू नये.शासन निर्णयाप्रमाणे इच्छुक उमेदवारांकडून स्वयंघोषणपत्र घेण्यात यावे, अशी मागणी जिल्हा ग्रामसेवक युनियन चंद्रपूरचे वतीने मा. जिल्हाधिकारी महोदयाना करण्यात आली आहे.
यासंदर्भात प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकानुसार, जिल्ह्यात ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकीचे नामनिर्देशन भरण्याचा कार्यक्रम सुरू असून,या पार्शवभूमीवर इच्छुक उमेदवारांकडून ग्रामसेवकाना विविध प्रमाणपत्राची मागणी केली जात आहे.

१२ फेब्रुवारी२०१९ रोजी राज्य शासनाने जारी केलेलीअधिसूचना आणि १३ फेब्रुवारी च्या शासन निर्णयानुसार ग्रामसेवकांना केवळ सात प्रकारचे दाखले देणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्यात प्रामुख्याने जन्म, मृत्यू , विवाह नोंद दाखला, दारिद्र्य रेषेखालील दाखला, ग्रामपंचायत येणे बाकी दाखला, करआकारणी आणि निराधार असल्याचा दाखला या बाबींचा समावेश आहे. असे दिलेल्या निवेदनानुसार प्रसिद्ध करण्यात आले आहे.

🔹तालुका ग्रामसेवक युनियन चे तहसीलदारांना निवेदन

चिमूर तालुका युनियन च्या वतीने, जिल्हा सरचिटणीस संजीव ठाकरे, जिल्हा उपाध्यक्ष मोतीराम मडावी, चिमूर तालुका अध्यक्षा कु. मंजुषा ढोरे, सचिव रमाकांत गुरुनुले,प्रसिद्धी प्रमुख केशव गजभे व अन्य पदाधिकारी यांनी दिनांक २२/१२/२०२० ला चिमूर तहसीलदार मा. सूर्यवंशी यांना निवेदन देऊन,ग्रामपंचायत निवडणुकीसाठी शासन निर्णयाप्रमाणे अंमलबजावणी करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली.