ग्राहक पंचायत महाराष्ट्र कोल्हापूर महानगर तर्फे ‘ राष्ट्रीय ग्राहक दिन ‘ उत्साहात साजरा

    100

    ✒️कोल्हापूर(पुरोगामी संदेश नेटवर्क)

    कोल्हापूर(दि.24डिसेंबर):- येथे ग्राहक पंचायत महाराष्ट्रच्या कोल्हापुर महानगर शाखेच्या वतीने सानेगुरुजी वसाहत केदारलींग बेकरी येथील पाटील हाॅल मध्ये ‘ राष्ट्रीय ग्राहक दिन ‘ साजरा करणेत आला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ग्राहक पंचायत महाराष्ट्र कोल्हापूर जिल्हा कायदेशीर सल्लागार अँड राजेंद्र वायगणकर उपस्थित होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष ग्राहक पंचायत महाराष्ट्र कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष बी. जे. पाटील हे होते.

    सुरवातीला प्रथम एज्युकेशन फाऊंडेशन मार्फत सल्लागार सुधाकर भदरगे यांनी महाराष्ट्र राज्य शासन आयोजित लोकसंवाद ऑनलाईन वेबीनारचे प्रक्षेपण स्क्रीनवर दाखवणेत आले. त्यानंतर मान्यवरांचे हस्ते फोटो पुजन करून महानगर सदस्या आरती पोतनीस यांच्या गणेश आराधनेने कार्यक्रमास सुरवात झाली…..!

    सुरवातीला महानगर अध्यक्ष अशोक पोतनीस यांनी पाहूण्यांचे स्वागत केले. त्यानंतर अॅड वायगणकर यांनी ग्राहक संरक्षण कायद्याचे महत्व विशद करताना ग्राहक कायद्याची निर्मीती व २०१९ च्या सुधारीत कायद्याची तरतुदीची विस्तारीत माहिती दिली. यानंतर उपाध्यक्ष जगदीश पाटील यांनी ग्राहक पंचायतचे काम करत असताना खुप काही शिकायला मिळते असे अपले मनोगत व्यक्त केले.

    यानंतर सल्लागार राजन पाटील यांनी ग्राहक पंचायतचे काम उत्कृष्ट पध्दतीने सुरू असून सदर कामाची व्याप्ती वाढत असून आपण बॅक, आरोग्य, राशन, शैक्षणिक, विज वितरण आशा विविध कामाच्या कमिटी नेमून कामं करणेचा सल्ला दिला. अध्यक्ष बी. जे .पाटील यांनी थोडक्यात केलेल्या कामाचा आढावा सांगीतला व ग्राहक पंचायतच्या माध्यमातून पदाधिकारी यांनी वर्षभर कोणते कार्यक्रम कशा पद्धतीने राबवायचे यांचे यांची सविस्तर माहिती दिली.
    यानंतर उपस्थितीत पदाधिकारी यांना महानगर तर्फे प्रशस्ती पत्र देऊन सत्कार करण्यात आला.

    या संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन महानगर अध्यक्ष अशोक पोतनीस, सचिव सचिन गणबावले, उपाध्यक्ष ई.जी.खोत यांनी केले. यावेळी महानगरचे नुतन सदस्य पदी सत्वशिल खाडे यांची निवड झाले बद्दल पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अशोक पोतनीस यांनी केले व आभार दिप्ती कदम यांनी मानले यानंतर प्रीती भोजनाचा कार्यक्रम पार पाडून कार्यक्रमाची सांगता झाली…!

    यावेळी जिल्हा सचिव दादासो शेलार, जिल्हा संघटीका पूनमदेसाई, जिल्हा सदस्य संजय पोवार, इचलकरंजी अध्यक्ष सुरेंद्र दास, करवीर अध्यक्ष यशवंतराव शेळके, महानगर पदाधिकारी मणीषा जाधव, प्रज्ञा यादव, प्रसन्नता चव्हाण, तानाजी पाटील, इचलकरंजीचे पदाधिकारी लालचंद पारीख, सुरेश सारवडे, संजय शिरदवडे, अशोक ठोमके, अमोल पराडकर, निळकंठ देसाई, शिवाजी पाटील, अक्षय पोतनीस इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते…..!