कत्तलीसाठी जाणाऱ्या १७ म्हशी पकडल्या

27

🔸RTO अधिकारी आणि पोलीस प्रशासनाचे अभिनंदन!

✒️संजय कोळी(विशेष प्रतिनिधी)मो:-9075716526

नंदुरबार(दि.25डिसेंबर):- कत्तलीसाठी १७ म्हशी घेऊन जाणाऱ्या गुजरातचा GJ ३१-T १८१६ ट्रकला RTO पकडले. स्थानिकांनी सदर माहिती गौरक्षक यांना दिली. गौरक्षक नरेंद्र पाटील, मयुर चौधरी यांच्यासह ६-७ गौरक्षक RTO कार्यालयात जाऊन प्रशासननाला सहकार्य केले. पोलीस प्रशासनाने गौरक्षक यांचा साहाय्याने सर्व म्हशी श्री अरिहंत गौशाळेत पाठवल्या. त्यात १४ म्हशी जिवंत तर ३ मृत अवस्थेत आढळुन आल्या.

अरिहंत गौशाळेचे सर्व कर्मचारी, संचालक आकाश जैन यांनी सर्व पशूंची लगेच चारा- पाणीची सोय केली. तसेच तात्काळ सर्व म्हशींना वैद्यकीय उपचार देण्यात आले. या सर्व कारवाई मध्ये RTO अधिकारी श्री बच्छाव साहेब, श्री जाधव साहेब, शहर पोलीस निरीक्षक श्री कळमकर साहेब, PSI सोनवणे साहेब यांनी मोलाचा सहभाग घेतला. रात्री उशिरा पर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.