कापसाच्या प्रश्नांवर सहकार मंत्र्याला शिरीष भोसले यांनी दिले निवेदन

37

🔹अहवाल सादर करण्याबाबत मंत्र्यांनी दिले आदेश

✒️अंगद दराडे(बीड,जिल्हा प्रतिनिधी)मो:-8668682620

बीड(दि.25डिसेंबर):-कापुस उत्पादक शेतकऱ्यांना हमीभावाच्या माध्यमातून चांगला दर देऊन दिलासा देण्यासाठी शासनाने कापुस सीसीआय केंद्र उघडले असले तरी तेथे शेतकऱ्यांनपेक्षा ईतर दलाल व पुढार्यांचाच मनमानी कारभार चालत असल्याचे चीत्र दिसुन येत असल्यामुळे या भोंगळ कारभारा विरुद्ध स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे शिरीष भोसले यांनी राज्याचे सहकार व पणन मंत्री श्री.बाळासाहेब पाटील यांना लेखी निवेदन देउन चर्चा केली.

केंद्र सरकारने या वर्षी कापसाला हमीभाव ५ हजार ८२५ रुपये जाहीर केला असून प्रत्यक्षात त्याचा लाभ मिळणारे शेतकरी तुलनेने कमीच आहेत. त्यामागचे महत्त्वाचे कारण म्हणजे कापुस खरेदी करण्याची हमीभाव केंद्राची उदासीनता व शासनाच ढिसाळ नियोजन आहे.या कारणास्तव हाच कापूस मग चार हजार रुपये क्विंटलच्या आसपास व्यापारी खरेदी करतात हे संकट टाळण्यासाठीच शासनाचा वेळीच हस्तक्षेप आवश्यक आहे.

कापसाचा उत्पादन खर्चाचा विचार केला तर निव्वळ पाच हजार रुपये हा उत्पादन खर्चावर खर्च होतो अशा परिस्थितीमध्ये जर का व्यापारी कवडीमोल दराने कापूस खरेदी करत असतील आणि शासकीय हमीभाव केंद्र खरेदी करण्यासाठी उदासीन असेल तर शेतकरी देशोधडीला लागल्याशिवाय राहणार नाही त्यामुळे ही विदारक परिस्थिती ओळखून शासनाने वेळीच हस्तक्षेप करावा अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे शिरीष भोसले यांनी केली आहे.

खरीप पेरणीच्या वेळेला शेतकरी सावकाराकडुन टक्केवारीने पैसे काढुन बी-बियाने खरेदी करतो कापसाचे उत्पादन
निघेपर्यंत त्या मुद्दल रकमेची दुप्पट रक्कम सावकार शेतकऱ्यांनकडुन वसुल करतो त्यामुळे ही रक्कम वेळीच परतफेड करणे अत्यंत गरजेचे असते.परंतु ही रक्कम परतफेड करण्यासाठी शेतकर्यांना कापुस विकल्याशिवाय पर्याय नसतो अशा परिस्थितीमध्ये जर का शासकीय केंद्रावर तो कापुस विकला तर दोन चारशे रुपये जास्त पदरात पाडून घेता येऊ शकते मात्र शासकीय हमीभाव केंद्रावर शेतकऱ्यांना दोन दोन महीने वाट पहावी लागत असेल तर शासनाने यात सखोल अभ्यास करणे आवश्यक आहे.

शासकीय हमीभाव केंद्रावर नेहमीच शेतकर्यांना वेगळी वागणूक व ईतर स्वंयघोषीत दलालांना वेगळी वागणूक पहायला मीळते शेतकर्यांचा उच्च दर्जाचा कापुस ग्रेडर नाकारतो व ईतर मंडळीचा खराब कापुस चांगल्या दराने खरेदी करतो हा भेदभाव संपुष्टात येऊन शेतकर्यांना सन्मानाने वागणुक देऊन त्याचा कापुस चांगल्या भावाने खरेदी करावा व शेतकऱ्यांना शासकीय सीसीआय केंद्रावर येणाऱ्या विवीध अडचणी संदर्भात शिरीष भोसले यांनी लेखी निवेदन देऊन चर्चा केली असुन सहकार मंत्र्यांनी पणन व सहकार विभागाला अहवाल सादर करुण योग्य ती कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.