चिमुर येथे मजूरानी घेतला शिवसेनेत प्रवेश

36

✒️चिमुर(पुरोगामी संदेश नेटवर्क)

चिमुर(दि.26डिसेंबर):- नगर परिषद येथे काम करणाऱ्या ठेकेदारी रोजनदारी काम करणाऱ्या मजूरानी शिवसेनेच्या कार्य प्रणालिवर विश्वास ठेऊन हुतात्मा स्मारक येथे झालेल्या कार्यक्रमात शिवसेने मधे प्रवेश घेतला.आगामी ग्राम पंचायत आणि चिमुर नगर परिषद निवडणूकीसाठी शिवसेने कंबर कसल्याच दिसून येत आहे, दिनांक 25 दिसेम्बर रोजी हुतात्मा स्मारक चिमुर येथे झालेल्या कार्यक्रमात शिवसेना पक्ष प्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कार्यप्रणाली वर विश्वास ठेवत शिबसेना जिल्हा प्रमुख यांच्या नितिन मत्ते यांच्या प्रमुख उपस्थित श्रीहरी उर्फ बालू सातपुते यांच्या नेतृत्वात 70 रोजनदारी कामगारानी शिवसेना पक्षात प्रवेश घेतला.

यावेळी माजी तालुका प्रमुख भाऊराव ठोम्बरे, माजी उपजिल्हा प्रमुख अनिल डगवार, माजी उपतालुका प्रमुख बंडू पारखी, विभाग प्रमुख सुधाकर निवटे, संतोष कामडी, सचिन शेट्टे, सारंग भट मंचकावर उपस्थित होते.कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता शशांक सहारे, पुंडलिक घोड़मारे, मोहन सोरदे, सुनील खुळसंगे, नितेश आड़े, विलास मेश्राम, धर्मेंद्र ओगले, राजकुमार मड़ावी, मनोज मड़ावी, सादिक शेख, मंगला सहारे, दीपा बघेल, अरुणा सांडेकर, शशिकला धोटे, विना सहारे यानी परिश्रम घेतले