शेतकरी

32

शेती भारताचा मुख्य व्यवसाय असून देशातील जवळपास ६५ टक्के जनता शेतीवर अवलंबून आहे.कोरोना महामारीत शेती व्यवसायाने मोठी मदत देशाला केली आहे.देशाला अन्न धान्य पुरवणारा शेतकरी आपल्या अस्तित्वासाठी कडाक्याच्या थंडीत आंदोलन करीत आहे.भारतातील शेतीचे जर राष्ट्रीयकरण केले असते तर आज जी शेतकऱ्याची फसवणूक चालली आहे ती झाली नसती.लहरी पावसाच्या मोसमाने शेतीचे मोठे नुकसान होत आहे.शेतकरी वर्गाचे मोठे शोषण होत आहे.शेतीसाठी काढलेले सावकारी व सरकारी कर्जाच्या ओझ्याखाली शेतकरी दबला आहे.कर्ज न फेडल्यामुळे देशातील लाखो बांधवाने आत्महत्या केल्या आहेत ही अत्यंत शोचनीय बाब आहे.भारतीय संविधानाने दिलेले शेतीचे अधिकार आजचे सरकार राक्षसी बहुमताने काढून टाकत आहे.

सारा देशच भांडवलदारांच्या घशात घालून देशाला धर्माच्या व विषमतेच्या गुलामगिरीत ढकलत आहे हे देशाच्या लोकशाहीसाठी नक्कीच धोकादायक आहे.शेतकरी स्वतःची जमीन वाचवण्यासाठी एक महिण्यापासून आंदोलन करत आहे तरी सरकार त्याच्या मागण्यावर विचार करतांना दिसत नाही.आम्ही केलेले कायदे हेच कसे श्रेष्ठ आहेत याचे तुणतुणे वाजवत आहे.जे सरकार जनतेकडून निवडणू आले आहे तेच सरकार जनतसोबत धोका करत आहे ही अत्यंत घातक घटना आहे.

शेतकरी आंदोलकांच्या वतीने ८ डिसेंबर २०२० ला भारत बंद ची हार दिली या बंदला भारतातून मोठा प्रतिसाद मिळाला.नागपूर शहरातही अनेक सामाजिक संघटनाने शेतीकरी आंदोलनाला पाठींबा दिला . नागपूरातील सामाजिक संघटनाने संविधान चौकात एकत्र येऊन सरकारच्या तुघलकी निर्णयाचे त्रीव्र शब्दात निषेध केला.सरकारच्या मुजोर वृत्तीने एक महिनापासून आंदोलन करत असलेल्या शेतकऱ्याकडे पाठ फिरवली आहे.काहि चर्चा घडल्या असल्या तरी सरकारने कोणतीही ठोस भूमिका न घेतल्याने आंदोलकांनी हे आंदोलन मोठे केले आहे.देशातील बहुसंख्य शेतकरी,सामान्य जनता या आंदोलनाला सहकार्य करत आहे हे भारतीय लोकशाहील एकात्मता व धर्मनिरपेक्ष तत्वाचे यश आहे. सरकारची आपली भूमिका न बदलता या कायद्याचे फायदे सांगण्यासाठी मोठे इव्हेंट सुरू केले आहेत.

आपल्या कार्यकर्त्यांच्या बळावर आंदोलनाला प्रतिआंदोलन करण्याचा कुठील डाव आखला या डावात भारतीय शेतकऱ्यानी व जनतेने फसू नये . शेतकरी आंदोलक फक्त स्वतःच्या फायद्यासाठी लढत नाही तर देशातील जमीनीवर होणाऱ्या भांडवलदारी व कंपण्याच्या कटकारस्थानाविरूध्द लढलेले हे आंदोलन भारतीय इतिहासातील महत्वाचे आंदोलन राहिला यात तिळमात्रही शंका नाही.भारतीय शेतकरी आता अडाणी राहला नाही.त्याला त्याच्या जीवनाचे सत्य गवसले आहे.देशातील काळ्या कायद्याने कसे शोषण केले हे हजारोवर्षापासून तो पाहात म्हणून आज त्यांनी आंदोलनाचे पलित उपसले आहे.

सरकार जर भांडवलदारांच्या हितासाठी लढत असेल तर जन आंदोलना शिवाय देशाला तरणोपाय नाही.शेतकरी आंदोलनातील क्रांती गीतांनी देशात नवे क्रांतीदर्शी वातावरण निर्माण केले आहे.देशाच्या मायभुमीसाठी लढण्यासाठी युवक तयार झाला आहे.खोट्या स्वप्न दाखविणाऱ्या कावेबाजापासून स्वतःचे रक्षण करण्यास तो सज्ज झाला आहे.दिल्लीच्या बार्डरवर येऊन स्वतःचे हक्क मागत आहे.देशातील अनेक राज्यात शेतकऱ्यानी असंतोष पुकारला आहे तो असंतोष देशातील गोदी मीडिया दाखवत नाही.शेतकरी आज कडाक्याच्या थंडीत आंदोलन करीत आहे.घरादाराची पर्वा न करता भारतीय शेतीला वाचवायला निघाला आहे.त्याचे आंदोलन यशस्वी होवो हीच मंगलकामना करतो.माझ्याकडून शेतकरी आंदोलनाला लाख लाख शुभेच्छा…!

✒️लेखक:-प्रा. संदीप गायकवाड,नागपूर
(मो:-९६३७३५७४००)