सुकन्या योजने अंतर्गत मुदत ठेव वाटप

115

🔹आमदार बंटीभाऊ भांगडीया यांचा सामाजिक उपक्रम

✒️चिमूर(पुरोगामी संदेश नेटवर्क)

चिमुर(दि.26डिसेंबर):-आमदार बंटीभाऊ भांगडीया व भांगडीया फौंडेशन च्या स्व श्रीमती धापुदेवी गोटूलालजी भांगडीया यांच्या स्मृती प्रित्यर्थ सुकन्या योजनेच्या नेरी जिल्हा परिषद क्षेत्रातील आठ पालकांना मुदत ठेव वाटप करण्यात आले.
सुकन्या योजना ही शासकीय नसून आमदार बंटीभाऊ भांगडीया यांनी आपल्या स्व खर्च निधीतून लहान बहिणीच्या पुढील कार्यासाठी मुदत ठेवींच्या माध्यमातून आर्थिक सहकार्य करणे हाच उद्देशातून असलेली सुकन्या योजना आहे .

यावेळी कु जागृती दिनेश पिसे नेरी, कु देवांशी रवींद्र ननावरे नेरी, कु कनिष्का उमेश कामडी नेरी, कु सानवि संतोष जीवतोडे नेरी , कु जियांशी योगेश सहारे बोथली ,कु श्रेया मुनेश्वर बोरकर शिरपूर , कु गार्गी बालाजी मेश्राम सावरगाव कु मनस्वी अतुल झाडे कळमगाव या मुलींच्या पालकांना यांचे हस्ते मुदत ठेव प्रदान करण्यात आले

यावेळी बकारामजी मालोदे ,समीर राचलवार ,रमेशजी कंचर्लावार योगेश नाकाडे संजय कुंभारे राजू बोडणे , मायाताई ननावरे ,गीताताई लिंगायत ,अरुण लोहकरे विकी कोरेकर नाजीया शेख आदी उपस्थित होते.