धुळे जिल्ह्यातील भरारी पथकाने अक्कलपाडा शिविरात एका टेम्पो जीप आळवून छापा टाकण्यात यशस्वी

31

✒️संजय कोळी(विशेष प्रतिनिधी)मो:-9075716526

धुळे(दि.26डिसेंबर):- देि.२५/१२/२०२०रोजी जिल्ह्यातील अक्कलपाडा शिवारातीर धुळे सुरत राष्ट्रीय महामार्गावरील वाहन क्रमांक टाटा ACE जीप टेम्पो क्र.MH१९- S- ८८५१ या वाहनाची तपासणी केली असता वाहनात बनावट देशी मधाचे खोके मिळून आले. भरारी पथकाने सदर मुदेमालाबद्दल वाहनचालकाला अधिक विचारणा केली असता. त्याने सांगितलं की माळी गल्ली नेर या गावात राहत्या घरी ठेवल्याचे सांगितले. त्याच वेळी त्यांच्या राहत्या घरी छापा टाकण्यात आला.व त्याचे राहत्या घरात दारूबंदी गुन्ह्यातील बनावट देशी दारू व तयार करण्यासाठी लागणारे साहित्य मिळून आल्याने मुद्येमाल व मुद्देमाल वाहतूक करण्यासाठी वापरण्यात आलेले वाहन जप्त करण्यात आले.

गाडीचा व पुढील वर्णाच्या मुद्देमाल रुपये १४९१४८/चा म जप्त करण्यात आला. सदर गुन्ह्यात आरोपीला अटक करण्यात आली आहे. आरोपीचे नाव राहुल दशरथ खलाणे वय ३० वर्ष रा.नेर ता. जी. धुळे असे आहे.सदर कायर्वाही श्री.बी.आर.नवले प्र निरीक्षक रा. ऊ. शु. फरारी पथक धुळे, श्री बी एस महाडिक निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क धुळे, श्री एस आर नजन दुय्यम निरीक्षक भरारी पथक धुळे, के एन गायकवाड, टी एस देशमुख, एसएस गोवेकर, ए बी निकुंबे, यांचे पथकाने सदर कारवाई केली असून पुढील तपासणी सीबीआर नवले प्र निरीक्षक भरारी पथक हे करत आहेत.