सोशल मिडीयाचा गैरवापर करत फेसबुक अकाऊंट हॅक करून केली पैशांची मागणी

32

🔺प्रा.जयप्रकाश मगर यांनी दिली पोलिस ठाण्यात तक्रार

✒️अनिल साळवे(गंगाखेड प्रतिनिधी)मो:-8698566515

गंगाखेड(दि.26डिसेंबर):-सोशल मिडीयाचा गैरवापर करत फेसबुक अकाउंट हॅक करुन गुगल पे व फोन पे द्वारे पैशाची मागणी करण्याचे प्रकार सध्या वाढत आहेत.याचाच प्रत्यय गंगाखेड येथिल सामाजिक चळवळीत सक्रीय असलेले सिने कलावंत व प्राध्यापक म्हणून कार्यरत असलेले प्रा.जयप्रकाश मगर यांना आला.

सोशल मिडीया वरील फेसबुक या माध्यमाचा वापर प्रा. जयप्रकाश मगर हे मागील अनेक वर्षांपासून करत आहेत.त्यांचा सोशल मिडीयावर चांगला मोठा मित्र परिवार आहे.दिनांक 24 डिसेंबर रोजी एका अज्ञात व्यक्तीने त्यांचे फेसबुक हॅक करुन नवीन अकाउंट काढले व मित्रांना पैशाची अडचण असुन मला तत्काळ गुगल पे व फोन द्वारे पैसे पाठवा असे मेसेज पाठवण्यास सुरुवात केली. पैशाची मागणी करणारे मेसेज येत असल्याची माहीती प्रा.जयप्रकाश मगर यांना दिली.

त्यानंतर त्यांनी WhatsApp वर मेसेज पाठवून सर्वांना फेसबुक अकाउंट हॅक झाले आहे व कोणीही पैसे पाठवु नयेत असे आवाहन मित्र मंडळीस केले.या प्रकरणी प्रा. जयप्रकाश मगर यांनी गंगाखेड पोलिस ठाण्याच्या पोलिस निरीक्षक वसुंधरा बोरगावकर यांची भेट घेऊन संबंधित प्रकार त्यांना सांगीतला या प्रकरणी गंगाखेड पोलिस ठाण्यात प्रा. जयप्रकाश मगर यांनी अज्ञात व्यक्ती विरुद्ध तक्रार दाखल केली आहे.